नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत आरपरिणाम 2026 : उत्तर प्रदेशातील “बुलडोझर राजकारण” महाराष्ट्रात आजिबात चालणार नाही, तुम्ही एक फहीम खानला (Fahim Khan)अटक केली, आज सहा लीडर निवडून आलेत्यामुळे. त्यामुळे बुलडोझरच्या माध्यमातून तुम्ही न्याय करण्याचा प्रयत्न कराल, एक घर तोडाल, तर तुम्ही मुस्लिमांमध्ये 100 नेते निर्माण कराल. आणखी एका फहीमला (Fahim Khan) चुकीच्या पद्धतीने अटक कराल, तर आज फक्त दोन प्रभागातून हद्दपार झालेला आपणचा पक्ष (भाजपचे नाव न घेता) उद्या शहरभरातून साफ होऊन जाल, असा गंभीर इशारा दिला आहे फहीम खान याने. फहीम खान हा नागपुरात मार्च 2025 मध्ये उसळलेल्या दंगलीचा (Nagpur Voilance) आरोपी असून सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. नुकतच झालेल्या महापालिका निवडणुकीत फहीम खानच्या पत्नी अलीशा खानने प्रभाग क्रमांक तीनमधून मोठा विजय मिळवला आहे. फहीम खानच्या पत्नीसह AIMIM चे एकूण सहा नगरसेवक निवडून आले आहे.
विशेष म्हणजे नागपूर दंगलीत (Nagpur Voilance) सहभागाच्या आरोपानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. तर नागपूर महापालिकेने फहीम खानच्या कुटुंबाचे घर बुलडोजर कारवाईद्वारे तोडले होते. त्या पार्श्वभूमीवर फहीम खानने एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना हे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
Fahim Khan on Nagpur Voilance : नागपुरात दंगल उसळली, तेव्हा मी माझ्या घरी होतो
दरम्यान, नागपूर दंगलीत सहभागाबद्दलच्या आरोपावरील प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. माझ्यावरील दंगलीबद्दलचे आरोप राजकारणाचा एक भाग होता. जेव्हा नागपुरात दंगल उसळली, तेव्हा मी माझ्या घरी होतो, असा दावाही फहीम खान यांनी केला आहे. युनिट राज्यात असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमनं खातं उघडलं आहे. एमआयएमनं 13 महापालिकांमध्ये 125 जागा जिंकवून आणल्या आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी ही कामगिरी ऐतिहासिक असल्याचं म्हटलं. भाजप किंवा विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत जाणार नसल्याचं ओवेसींनी स्पष्ट केलं. ओवेसींनी म्हटलं की आमची लढाई आम्हाला जनादेश देणाऱ्यांसाठी असेल, सत्तेच्या समीकरणाची नसेल, असेही ते म्हणाले. दरम्यान नागपुरात देखीलएमीम चे एकूण सहा नगरसेवक निवडून आले आहेत्यामुळे.
Fahim Khan : कोण आहे फहीम खान?
-17 मार्च 2025 रोजी नागपूरच्या महाल परिसरात दंगल उसळली होती..
-त्या दंगलीत महाल पासून अनेक किलोमीटर लांब राहणाऱ्या फहीम खानचा सहभाग होता असे आरोप करत पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता…
-तेव्हा फहीम खानला अटकही करण्यात आली होती..
-तर दंगलीनंतर महापालिकेने फहीम खानच्या कुटुंबीयांचा राहता घर बुलडोझरने पाळून टाकला होता…
-सुमारे चार महिने तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर फहीम खानची सुटका झाली आहे…
-नुकतच झालेल्या महापालिका निवडणुकीत फहीम खानची पत्नी अलिशा खान ने प्रभाग 3 मधून AIMIM च्या तिकिटावरून निवडणूक लढवत विजय मिळवला..
-आता पत्नीच्या महापालिका निवडणुकीतील विजयानंतर फहीम खान पालिकेने पाडलेला तोच घर पुन्हा उभारणार असल्याचे सांगत आहे…
आणखी वाचा