Divorce : मी या मतलबी स्त्रीला..एका मोठ्या राजकीय कुटुंबात होणार घटस्फोट, बायकोला थेट म्हटलं की…
admin January 19, 2026 04:24 PM
[ad_1]

समाजवादी पार्टीचे सुप्रीमो अखिलेश यादव यांचा भाऊ प्रतीक यादव पत्नी अपर्णा यादवला घटस्फोट देणार आहे. मुलायम यांच्या कुटुंबातील सूनबाई अपर्णा यादव भाजप महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांनी समाजवादी पार्टीवर अनेकदा टीका केली आहे. प्रतीक यादव यांनी इन्स्टावर पोस्ट शेअर करुन अपर्णाला कुटुंब तोडणारं ठरवलं. “मी या मतलबी स्त्रीला लवकरात लवकर घटस्फोट देणार आहे. हिने माझ्या कुटुंबाची नाती बिघडवली आहेत. तिला फक्त प्रसिद्ध आणि प्रभावी बनायचं आहे. आता माझं मानसिक आरोग्य खराब आहे. तिला त्याचा काही फरक पडत नाही. कारण तिला स्वत:ची चिंता आहे. मी इतकी वाईट स्त्री कधी पाहिलेली नाही. दुर्देवाने माझं तिच्यासोबत लग्न झालं” असं प्रतिक यादवने सोशल मिडिया पोस्टवर लिहिलं आहे.

मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादवने समाजवादी पार्टी सोडून भाजपत प्रवेश केला. आता त्या भाजप महिला राज्य आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. अलीकडेच त्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी मुंबईत आल्या होत्या. अपर्णा यादव यांनी नेहमीच समाजवादी पार्टीवर टीका केली आहे. त्यामुळे यादव कुटुंबातीलच व्यक्ती पक्षाविरोधात आहे, असं विरोधक बोलतात. अपर्णाचा भाऊ अमन बिष्टने सांगितलं की, प्रतीकच अकाऊंट हॅक झालय आणि फोनही लागत नाहीय.

फॅमिली विनाशक म्हटलं

पती प्रतीक यांनी जाहीरपणे अपर्णाला फॅमिली विनाशक म्हटलं आहे. अपर्णा यांनी यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. पण चर्चांचा बाजार गरम आहे. मुलायम यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद बाहेर येतील असं टीकाकार म्हणत आहेत. प्रतीक यादव किंवा अपर्णा यादव यांच्या नातेवाईकांनी अजून घटस्फोटाच्या वृत्ताची पुष्टी केलेली नाही. अपर्णाचा भाऊ अमन बिष्ट यांचं असं म्हणणं आहे की, हे सोशल मिडिया अकाऊंट हॅकचा प्रकार असू शकतो.

 


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.