Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी ६’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये आता एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा ट्विस्ट म्हणजे ‘उल्टा-पुल्टा रूम’! ही खोली या वर्षीच्या घरात प्रथमच दिसत आहे आणि या खोलीमुळे स्पर्धेवर आणि स्पर्धकांवर कसा परिणाम पडतो याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
या सिझनमध्ये घराची थीम ८०० खिडक्या ९०० दारे अशी ठेवण्यात आली असून, प्रत्येक स्पर्धकला कुठले दार कधी उघडाणार हे सांगता येत नाही. अशाच अनेक दरांपैकी एक विशेष दार उघडल्यावर मिळणारी ही ‘उल्टा-पुल्टा’ खोली आहे. या रूममध्ये सगळ्या वस्तू उलट्या दिसतात आणि याचा गेमवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे कोणाचा खेळ मजबूत होईल आणि कोणाचा खेळ संपेल हे सर्व या रूमच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे!
Border 2: 'बॉर्डर २'च्या शेवटी प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज; धुरंधरची होणार जबरा एन्ट्रीघराची कॅप्टन प्राजक्ता या विशेष खोलीमध्ये प्रवेश करणारी पहिली स्पर्धक आहे. बिग बॉसने तिला विचारले, 'या रूममध्ये संपूर्ण गेम उलटा-पुलटा करण्याची ताकद आहे. आपण काय निवडणार?” यावरून लक्षात येते की या रूममध्ये जाणाऱ्या स्पर्धकाला विशेष पॉवर मिळू शकते. ज्याचा वापर पुढील चॅलेंज्स किंवा इतरांच्या विरोधात केला जाऊ शकतो.
Dharmendra House: 'धर्मेंद्र हाऊस' बाबत सनी अन् बॉबी देओलने घेतला मोठा निर्णय; जुहूमधील ६० कोटींचा बंगला आता...View this post on InstagramA post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
शोचे पहिले आठवडा खूपच रंजक होता. पहिल्या आठवड्यात कोणालाही घरातून बाहेर काढण्यात आले नाही आणि नॉमिनेट स्पर्धक दुसऱ्या आठवड्यातही खेळणार आहेत. पुढील भागात काय होणार हे पाहण्यासाठी 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे.