'भाभी जी घर पर हैं!' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
अभिनेता आसिफ शेखने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला भयंकर प्रसंग सांगितला.
शूटिंगच्या सेटवर मोठे झाड कोसळले.
टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो 'भाभी जी घर पर हैं!' आता मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. अलिकडेच 'भाभी जी घर पर हैं- फन ऑन द रन' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमात लाँच करण्यात आला. चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on InstagramA post shared by Aasif Sheikh (@iaasifsheikhofficial)
ट्रेलर लाँच वेळी चित्रपटातील अभिनेता आसिफ शेखने एक धक्कादायक खुलासा केला. त्याने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला किस्सा सांगितला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक अपघात झाला. ज्यात अभिनेता आसिफ शेख आणि रवी किशन यांचा जीव थोडक्यात वाचला. नेमकं चित्रपटाच्या शूटिंगवर झाले काय? जाणून घेऊयात.
आसिफ शेख म्हणाला की, "रवी आणि मी एकमेकांच्या शेजारी बसलो होतो. आराम करत कॉफीपीत होतो. अचानक जवळपास 12-13 फूट उंच एक मोठे झाडआमच्या अगदी मध्यभागी कोसळले. तो क्षण इतका भयानक होता की जर आमच्यापैकी कोणीही त्याच्या खाली आले असते तर आमचे तुकडे तुकडे झाले असते. त्या क्षणी आम्ही दोघेही पूर्णपणे स्तब्ध झालो होतो, काय घडले हे समजलेच नाही..."ही घटना चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी घडली होती.
View this post on InstagramA post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)
पुढे रवी किशन म्हणाले की, "झाडाचे वजन किमान 500 किलो असावे. जेव्हा ते पडले तेव्हा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण सेट हादरला..." या अपघातात रवी किशनच्या खांद्याला दुखापत झाली. चित्रपट निर्माते संजय कोहली म्हणाले की, " या घटनेनंतर सेटवर अर्धा तास भयंकर शांतता होती. सर्वजण घाबरले होते. उपचारानंतर रवी किशन आले आणि म्हणाले, "चला शूटिंग सुरू करूया" हे कौतुकास्पद होते..."
'भाभी जी घर पर हैं!' रिलीज डेट काय?'भाभी जी घर पर हैं! - फन ऑन द रन' हा लोकप्रिय टीव्ही फ्रँचायझीमधील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात शुभांगी अत्रे, विदिशा श्रीवास्तव, आसिफ शेख, रोहिताश्व गौर, रवी किशन, मुकेश तिवारी आणि निरहुआ यांसारखे कलाकार झळकले आहेत. हा चित्रपट 6 फेब्रुवारी 2026 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Famous Singer : प्रसिद्ध गायकाची प्रकृती बिघडली; रुग्णालयातून PHOTO आला समोर, हातावर IV ड्रिप लावलेली पाहून चाहते घाबरले