वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील (WPL 2026) 13 व्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. मुंबईचा हा या मोसमातील सहावा आणि तर दिल्लीचा पाचवा सामना असणार आहे. मुंबईला या मोसमात 2 विजयानंतर सातत्य राखण्यात अपयश आलं. तर दिल्ली पूर्णपणे भरकटलीय. त्यामुळे दोन्ही संघांचा मंगळवारी होणार्या या सामन्यात विजय मिळवून कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात आता या सामन्यात कोण जिंकणार? हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.