कल्लाकुरीची
तामिळनाडूत कल्लाकुरिची जिल्ह्याच्या मनालुरपेट्टईमध्ये थेनपेनई रिव्हर फेस्टिव्हलदरम्यान फुग्यांसाठी आणले गेल्या हेलियम गॅसने भरलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एका इसमाचा मृत्यू झाला तर कमीतकमी 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेलियम गॅसने भरलेले फुगे विकणाऱ्या एका दुकानात ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तामिळनाडूत आत्रु थिरुविझा नावाचा हा उत्सव तमिळ महिना थाईच्या पाचव्या दिवशी विल्लुपुरम, कु•ालोर आणि कल्लाकुरिची यासारख्या जिल्ह्यांमध्ये साजरा केला जातो.