जिंकायचं असेल तर…! पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमची पुन्हा लाज काढली
GH News January 21, 2026 07:11 PM

बिग बॅश लीग स्पर्धेत थेट अंतिम फेरी गाठण्याचं सिडनी सिक्सर्सचं स्वप्न भंगलं आहे. आता क्वॉलिफायर 2 मध्ये पुन्हा एकदा संधी असणार आहे. पण या सामन्यापूर्वी सिडनी सिक्सर्स संघाला एक सल्ला मिळाला आहे. बाबर आझमच्या फॉर्मवरून माजी क्रिकेटपटू मार्क वॉ याने कान टोचले आहेत. बाबर आझम हा 11 सामन्यातील 7 सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद झाला. त्याची कामगिरी पाहून मार्क वॉने संताप व्यक्त केला आहे. इतकंच काय तर सिडनी सिक्सर्सला सामना जिंकायचा असेल तर बाबर आझमला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवा असा सल्लाही दिला आहे. एलिमिनिटेर फेरीत होबार्ट हरीकेंस आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यातील विजय संघ सिडनी सिक्सर्सशी क्वॉलिफायर 2 फेरीत भिडणार आहे. यावेळी समालोचन करताना मॉर्क वॉने आपलं परखड मत मांडलं. मार्क वॉच्या मते बाबर आझम वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. पण त्याची बॅट सध्या शांत असून त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देणं गरजेचं आहे.

क्वॉलिफायर 1 सामन्यात बाबर आझम खातंही खोलू शकला नव्हता. पर्थ स्कॉर्चर्सविरुद्धच्या सामन्यात दुसर्‍या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. उलट विकेट गेल्याने दबाव वाढला. सिडनी सिक्सर्सने या सामन्यात फक्त 99 धावा केल्या आणि सामना 48 धावांनी गमावला. हा सामना गमावल्याने सिडनी सिक्सर्सला क्वॉलिफायर 2 चा सामना खेळावा लागणार आहे. बाबर आझमने 11 डावात फक्त 202 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 103.06चा आहे.

बाबर आझमला सूर गवसताना दिसत नाही. दुसरीकडे, बाबर आझम आपल्या भलत्यात कृत्यामुळे चर्चेत आला आहे. एकतर संथ गतीने सुरू असलेली फलंदाजी पाहून स्टीव्ह स्मिथ नाराज झाला होता. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर धाव घेण्यात त्याने नकार दिला. बाबर आझमला या गोष्टीचा प्रचंड राग आला. स्टीव्ह स्मिथवर त्याने नाराजी व्यक्त केली. इतकंच काय तर बाद झाल्यानंतर त्याने बॅट हवेत जोरात फिरवली होती. याबाबतचा खुलासा खुद्द कर्णधार हेनरिक्सने केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.