-rat२०p१३.jpg-
२६O१८९६८
चिपळूण : भूगोल स्पर्धेत यश मिळवणारे रत्नागिरीच्या डीजीके महाविद्यालयाचे विद्यार्थी, शेजारी मान्यवर.
-----
डीजीके महाविद्यालयाचे भूगोल स्पर्धेत यश
रत्नागिरी, ता. २० : चिपळूणच्या डीबीजे कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या भूगोल स्पर्धेत देव, घैसास, कीर महाविद्यालयातील अनुष्का नागवेकर (द्वितीय वर्ष विज्ञान) व संगीता कांबळे (प्रथम वर्ष विज्ञान) या विद्यार्थ्यांनी पीपीटी सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. संगीता कांबळे आणि आर्यन वाघधरे (तृतीय वर्ष विज्ञान शाखा) या विद्यार्थ्यांनी नकाशा भरणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. आर्यन वाघधरे हा विद्यार्थी प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी झाला होता. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी अभिनंदन केले
rat२०p१४.jpg-
२६O१८९७३
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात औद्योगिक जैवतंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभागी विद्यार्थी.
गोगटे महाविद्यालयात औद्योगिक
जैवतंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम
रत्नागिरी ः पीएम-उषा योजनेंतर्गत गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत औद्योगिक जैवतंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले. या अंतर्गत टी. जे. मरिन प्रॉडक्ट्स कंपनीत औद्योगिक भेटीचे आयोजन केले. अभ्यासक्रमात ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना सौरभ शिंदे (गद्रे मरिन एक्स्पोर्ट), ओंकार केतकर (व्हेंट्री बायोलॉजिकल्स, पुणे), बॉस्को बोथेलो (सिरम इन्स्टिट्यूट, पुणे), सिद्धी राउळ (मोलबायो डायग्नोस्टिक्स, गोवा) आणि प्रीती आंब्रे (टी. जे. मरिन प्रॉडक्ट्स प्रा. लि.) यांचा समावेश होता. उद्घाटनप्रसंगी पीएम उषा समन्वयक व विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, समन्वयक डॉ. यास्मीन आवटे, उपक्रम संयोजिका व जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. रश्मी भावे उपस्थित होत्या. समारोप समारंभात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
-rat२०p१२.jpg-
P२६O१८९६७
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात बोलताना कौस्तुभ सरदेसाई. सोबत प्रा. मधुरा पाटील, प्रा. वैभव घाणेकर आदी.
‘युवकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी’
रत्नागिरी ः युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन कौस्तुभ सरदेसाई यांनी केले. देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय युवादिन कार्यक्रमात बोलत होते. महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले होते. या प्रसंगी प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. राखी जाधव, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवादिन आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील उपस्थित होते.
-rat२०p१५.jpg-
२६O१८९७४
रत्नागिरी : अभ्यंकर बालविद्यामंदिरच्या स्नेहसंमेलनात नगराध्यक्ष व माजी शिक्षिका शिल्पा सुर्वे यांचा सत्कार करताना दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर.
अभ्यंकर बालविद्यामंदिराचे स्नेहसंमेलन उत्साहात
रत्नागिरी ः दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालविद्यामंदिराचे स्नेहसंमेलन उत्साहात झाले. प्रमुख पाहुण्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे उपस्थित होत्या तसेच नगरसेविका सुप्रिया रसाळ, नगरसेवक नितीन जाधव, संस्थेच्या कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर, उपाध्यक्षा अॅड. सुमिता भावे, बालक मंदिराच्या व्यवस्थापिका आगाशे, मुख्याध्यापिका प्रज्ञा काळे, माजी मुख्याध्यापिका मीना रिसबूड उपस्थित होत्या. मोबाईलचा वापर कमी करा, मुलांना गोष्टीत, गाण्यांमध्ये रमवा, असे प्रमुख पाहुण्या सुर्वे यांनी सांगितले. बालदोस्त व सर्व शिक्षिका, सेविका यांनी घेतलेल्या मेहनतीचेही त्यांनी कौतुक केले. त्यानंतर मुलांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. सर्व कार्यक्रमांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या व्यवस्थापिका, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षिका यांनी केले.