Kolhapur ZP : महापौर टॉस टाळण्यासाठी भाजप आक्रम, ४१ च्या बहुमतासाठी हालचाली; सांगलीत महायुतीची सत्ता निश्चित होणार?
esakal January 21, 2026 09:45 PM

कोल्हापूर : करवीर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, संकटाच्या काळातही आम्ही काँग्रेसची साथ सोडलेली नाही. पिढ्यान्पिढ्या काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आता जिल्हा परिषद निवडणुकीत संधी द्यावी, अशी ठाम मागणी करवीर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे आज केली.

करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द, शिये, निगवे खालसा, सांगरूळ, वडणगे आणि सडोली खालसा या जिल्हा परिषद सहा गटांतील इच्छुक ५१ उमेदवारांच्या मुलाखती खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील व आमदार जयंत आसगावकर यांनी घेतली.

Kolhapur Zilla Parishad : बदललेली समीकरणे आणि महायुतीची ताकद; कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची कसोटी

आमदार पाटील म्हणाले, ‘जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला आहे. काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्ष जो उमेदवार ठरवेल, त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. सध्या अडचणीचा काळ आहे.

तुमची साथ महत्त्वाची आहे. ज्याला उमदेवारी मिळेल त्याच्या मागे ठामपणे उभे राहूया. आपली ताकद दाखण्यासाठी गटात आणि गणामध्ये बंडखोरी करू नका, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. गोकुळचे संचालक चेतन नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगुले, काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील, उदयानिदेवी साळुंखे आदी उपस्थित होते.

Sindhudurg ZP : जिल्हा परिषद निवडणुकीत देवगडात मोठी चुरस; आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलली निगवेत तोडीस तोड उमेदवाराची तयारी

निगवे खालसा गटातून काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) एका नेत्याच्या पत्नीला उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसकडूनही त्याठिकाणी तोडीस तोड उमेदवार देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

...तरीही काँग्रेससोबतच राहू

स्व. आमदार पी. एन. पाटील यांनी करवीर तालुक्यात काँग्रेसची एकनिष्ठ भूमिका घराघरांत पोहोचवली, अशी भावना इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात काहींनी वेगळी भूमिका घेतली असली, तरी करवीरमधील एकनिष्ठ कार्यकर्ता आजही काँग्रेससोबत असून, भविष्यातही राहील, अशी भूमिका इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.