अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) टी-20 क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय लिहिला आहे. 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये सर्वाधिक वेळा अर्धशतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा जागतिक विक्रम संयुक्तपणे फिल सॉल्ट, सूर्यकुमार यादव आणि एविन लुईस यांच्या नावावर होता, ज्यांनी 25 पेक्षा कमी चेंडूंमध्ये प्रत्येकी 7 वेळा अर्धशतके ठोकली होती. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अवघ्या 22 चेंडूंमध्ये 50 धावा पूर्ण करत अभिषेकने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
आता त्याच्या नावावर अशा प्रकारची 8 अर्धशतके जमा आहेत.
टी-20 मध्ये 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये सर्वाधिक अर्धशतके:
8 वेळा: अभिषेक शर्मा (भारत)
7 वेळा: फिल सॉल्ट (इंग्लंड)
7 वेळा: सूर्यकुमार यादव (भारत)
7 वेळा: एविन लुईस (वेस्ट इंडिज)
नागपूरच्या मैदानात अभिषेक शर्माने आपल्या टी-20 कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. सलामीला येत त्याने केवळ 35 चेंडूंत 84 धावांची जबरदस्त खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 240.00 होता. अभिषेकच्या या खेळीत 5 चौकार आणि 8 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.