Honey Trap Case : महिलेचे तब्बल 100 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; हनीट्रॅप-ब्लॅकमेलिंगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नवरा-बायकोचं नेमकं प्रकरण काय?
esakal January 21, 2026 08:45 PM

Instagram Honey Trap : लोक करमणूक, संवाद आणि माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असताना, काही गुन्हेगार त्याच माध्यमांचा गैरवापर करून गंभीर गुन्हे करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्यात पती-पत्नीने मिळून उभारलेल्या हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणाने पोलिसांनाही हादरवून सोडले आहे.

कर्ज फेडण्यासाठी आणि ऐशोआरामी जीवन जगण्यासाठी नैतिकतेच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या या जोडप्याला अरेपल्ली परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासानुसार, आरोपींनी आतापर्यंत सुमारे १,५०० पुरुषांना फसवले असल्याचा अंदाज आहे.

इंस्टाग्राम-युट्यूबवरून 'बळी' शोधण्याचा उद्योग

तपासात असे उघड झाले आहे, की आरोपी महिला सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय होती. तिने इंस्टाग्रामवर ‘लॅलीडिंपलक्वीन’ तर युट्यूबवर ‘करिमनगर पिल्ला १४३’ या नावाने अकाउंट्स चालवले होते. ग्लॅमरस फोटो, व्हिडिओ आणि संवादांच्या माध्यमातून ती पुरुषांशी मैत्री साधत असे. विश्वास संपादन झाल्यानंतर संबंधित पुरुषांना भेटण्यासाठी ती आपल्या खोलीत बोलवत असे.

लातूर हादरलं! जन्मदात्या आईने पोटच्या गोळ्यावर तब्बल 17 वेळा चाकूने केले सपासप वार; चिमुरडीच्या तोंडातही खूपसला चाकू, उंबरठा रक्ताने... खाजगी क्षणांचे गुप्त चित्रीकरण

पुरुष खोलीत आल्यानंतर तिचा पती आधीच लपून बसलेला असायचा. तो त्यांच्या खाजगी क्षणांचे गुप्तपणे व्हिडिओ चित्रीकरण करत असे. नंतर हे आक्षेपार्ह व्हिडिओ वापरून पीडितांना धमकावले जाई आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे सुमारे १०० पुरुषांशी शारीरिक संबंध होते आणि या सर्वांचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करण्यात आला.

ब्लॅकमेलिंगमधून कोट्यवधींची संपत्ती

या बेकायदेशीर हनीट्रॅप व्यवसायातून अवघ्या काही महिन्यांतच आरोपी जोडप्याने प्रचंड संपत्ती जमवली. तपासात समोर आले आहे, की ब्लॅकमेलिंगमधून मिळालेल्या पैशांतून त्यांनी अरेपल्ली येथे ६.५ दशलक्ष रुपयांची जमीन खरेदी केली होती. याशिवाय १० दशलक्ष रुपयांची आलिशान कार, तसेच घरासाठी महागडे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी करण्यात आले होते. त्यांच्या ऐशोआरामी जीवनशैलीमागे एवढे काळे सत्य दडलेले आहे, याची कुणालाही कल्पना नव्हती.

Lanja Crime : घरात आढळला सडलेला मृतदेह; डाव्या हातावर मोठी जखम, पाच दिवसांपासून लेक करत होती फोन, पण..; घातपाताचा संशय ट्रक व्यावसायिकाच्या तक्रारीमुळे रॅकेटचा पर्दाफाश

करीमनगरमधील एका ट्रक व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. आरोपींनी या व्यावसायिकाकडून आधीच १.३ दशलक्ष रुपये उकळले होते. मात्र, लोभ न भागल्याने त्यांनी आणखी ५ दशलक्ष रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली.

इतर पीडितांचा शोध सुरू

सध्या पोलिस इतर पीडितांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. अनेक पीडित महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांतील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या संपूर्ण रॅकेटचा अधिक तपास सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.