Sania Mirza : सानिया मिर्झाने सोडलं भारताचं नागरिकत्व ? मोठी माहिती समोर
Tv9 Marathi January 20, 2026 05:45 PM

Sania Mirza Citizenship : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) ही टेनिस कोर्टावरून निवृत्त झाली असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि नागरिकत्वाबद्दल सोशल मीडियावर अजूनही चर्चा सुरू असते. तिचा खेळ, तिचं लग्न, तिचा घटस्फोट, तिचं दुबईत राहण याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं असतं. तिने शोएब मलिकशी लग्न केलं होतं, नंतर त्यांचा घटस्फोट झाला. ती दुबईत देखील स्थायिक झाली. त्यामुळे एक प्रश्न हमखास विचारला जातो, तो म्हणजे सानिया मिर्झा अजूनही  ‘भारतीय’ आहे का ? सानिया मिर्झाचा पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकशी घटस्फोट होऊन दोन वर्षे झाली असली तरी, टेनिस स्टार सानिया अजूनही भारतीय पासपोर्ट वापरते का याबद्दही प्रश्न उपस्थित होत असतात.

सानिया अजूनही भारतीय नागरिक आहे का?

तिच्या नागरिकत्वाबद्दल लोकांना अजूनही प्रश्न पडतात. तर त्याच थेट, साधं , सोपं उत्तर आहे की हो, सानिया आजही भारतीय नागरिक आहे. तिच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि तिने कधीच दुसऱ्या देशाच्या (पाकिस्तान किंवा युएई) नागरिकतेसाठी अर्ज केलेला नाही. सानियाने देखील अनेक मुलाखतींमध्ये हे स्पष्टपणे सांगितलं आहे की. “मी भारतीय आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत भारतीयच राहीन.”

दुबई चा ‘गोल्डन वीजा’ आणि नागरिकतेबद्दल संभ्रम

भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा गेल्या अनेक वर्षांपासून दुबईमध्ये राहत आहे. तिच्याकडे युएईचा “गोल्डन व्हिसा” आहे, जो 10 वर्षांचा निवास परवाना (Residency Permit) आहे. पण बरेच लोक याला नागरिकत्व समजतात, मात्र असं नाहीये. या परमिटमुळ तिला फक्त तिथे राहण्याची आणि व्यवसाय करण्याची परवानगी मिळते. सानिया दुबईला तिचे “दुसरं घर” मानते, परंतु तिचे हृदय आणि नागरिकत्व नेहमीच भारतातच राहिले आहे. सानिया मिर्झा दुबईमध्ये एक अकादमी चालवते आणि ती दुबई स्पोर्ट्सची राजदूत देखील आहे.

Sania Mirza : इथे शोएब मलिकच्या घटस्फोटाच्या चर्चा, तर तिथे सानिया मिर्झाची नवी पार्टनरशिप; नेटकरीही अवाक्!

सानिया मिर्झाने पाकिस्तानी नागरिकत्व का स्वीकारलं नाही?

2010 साली पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केल्यानंतरही सानियाने तिची ओळख बदलली नाही. भारतीय कायद्यानुसार, दुहेरी नागरिकत्वाला परवानगी ​​नाही. जर सानियाने पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारलं असतं तर तिला तिचा भारतीय पासपोर्ट परत करावा (Surrender) लागला असता, पण तिने तसं कधीच केलं नाही. तिने नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय ध्वजाला, तिरंग्याला सन्मान मिळवून दिला. पाकिस्तानी खेळाडू शोएबशी लग्न झाल्यानंतरही ती भारतासाठी खेळत राहिली.

सानियाचा घटस्फोट

साधारण दोन वर्षांपूर्वी सानिया आणि शोएब मलिकयांचा घटस्फोट झाला. दशकभराच्या वैवाहिक नात्यानंतर सानिया- शोएबचं नातं मोडलं. सानिया सध्या सिंगल पॅरेंट असून मुलासोबत दुबईत राहते. तिच्याशी घटस्फोट झाल्यावर शोएब मलिकेने थोड्याच काळात पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी दुसलं लग्न केलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.