मधुमेह (डायबिटीस) ही एक दीर्घकालीन जीवनशैलीशी संबंधित आजाराची समस्या असून रक्तातील साखरेची पातळी सतत वाढलेली राहणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. मधुमेह होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे शरीरात इन्सुलिन हार्मोनची कमतरता किंवा इन्सुलिन योग्य प्रकारे कार्य न करणे. स्वादुपिंड (पॅन्क्रिया) इन्सुलिन तयार करते, जे रक्तातील साखर पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करते. जेव्हा इन्सुलिन कमी तयार होते किंवा पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा साखर रक्तात साचते आणि मधुमेहाची समस्या निर्माण होते. असंतुलित आहार, जास्त साखर व जंक फूडचे सेवन, कमी शारीरिक हालचाल आणि वाढलेले वजन ही मधुमेहाची प्रमुख कारणे मानली जातात. तसेच आनुवंशिकता म्हणजेच कुटुंबातील इतिहास असल्यास मधुमेह होण्याचा धोका अधिक वाढतो.
याशिवाय बदलती जीवनशैलीही मधुमेह वाढण्यामागे मोठी भूमिका बजावते. सतत तणाव, अपुरी झोप आणि मानसिक असंतुलन यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्याचा थेट परिणाम रक्तातील साखरेवर होतो. वाढते वय, हार्मोनल बदल (विशेषतः महिलांमध्ये), गर्भधारणेदरम्यान होणारा गर्भावस्थेतील मधुमेह, तसेच थायरॉईडसारखे इतर हार्मोनल विकार हेही मधुमेहास कारणीभूत ठरू शकतात. दारूचे अति सेवन, धूम्रपान आणि शारीरिक निष्क्रियता यामुळे इन्सुलिन प्रतिकारशक्ती वाढते.
मधुमेह टाळण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, तणावमुक्त जीवनशैली आणि नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी काळजी घेतल्यास मधुमेह नियंत्रित ठेवता येतो आणि त्यातून होणाऱ्या गुंतागुंती टाळता येतात. मधुमेह हा केवळ एक आजार नाही तर एक मोठे आर्थिक आव्हान बनले आहे. यामुळे केवळ आरोग्यालाच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण होत आहे. एका नव्या आंतरराष्ट्रीय अभ्यासात असे समोर आले आहे की, मधुमेहामुळे भारताला सुमारे 11.4 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या भारतात सुमारे 21.2 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. म्हणजेच जगातील एकूण मधुमेहाच्या रुग्णांपैकी एक मोठा भाग भारतात आहे. सर्वात चिंताजनक गोष्ट ही आहे की यापैकी जवळजवळ ६२ टक्के लोक उपचारही घेत नाहीत . जगभरात, सुमारे 83 दशलक्ष प्रौढ लोक सध्या मधुमेहाशी झुंज देत आहेत. 2050 पर्यंत ही संख्या वाढून 130 कोटींवर जाईल, असा अंदाज आहे. म्हणजे प्रत्येक दहापैकी एका प्रौढाला या आजाराचा संसर्ग होईल.
हा एक असा आजार आहे ज्यामध्ये इन्सुलिन कमी बनते किंवा शरीरात योग्यरित्या काम करत नाही . यामुळे रक्तातील साखरेची पातळी खूप वाढते. हा आजार अनुवांशिकही असू शकतो, परंतु खराब आहार, लठ्ठपणा, तणाव आणि शारीरिक श्रमाचा अभाव ही याची प्रमुख कारणे आहेत.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड सिस्टम्स अॅनालिसिस, हायडलबर्ग, व्हिएन्ना विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, हुआझोंग विद्यापीठातील संशोधकांच्या मते, 212 दशलक्ष भारतीय मधुमेहाशी झुंज देत आहेत. चिंताजनक गोष्ट ही आहे की भारतात मधुमेहाने ग्रस्त सुमारे ६२ टक्के रुग्ण उपचारही घेत नाहीत . या अभ्यासात उपचाराचा खर्च, काम न केल्याने होणारे नुकसान आणि रुग्णाची काळजी घेण्यासाठी लागणारा वेळ यांचा समावेश करण्यात आला आहे. जगभरात मधुमेहामुळे होणारे आर्थिक नुकसान सुमारे 10.2 ट्रिलियन डॉलरचे आहे. अभ्यासानुसार, जर कुटुंबातील सदस्यांना देण्यात येणाऱ्या मोफत काळजीचा खर्चही जोडला गेला तर हे नुकसान वाढून 152 ट्रिलियन डॉलर होते. म्हणजेच मधुमेह आता कर्करोग आणि अल्झायमर सारख्या आजारांपेक्षा महाग असल्याचे सिद्ध होत आहे. भारतात रुग्णांची संख्या खूप जास्त असल्याने त्याचे ओझे जास्त आहे. अनेक लोक उपचार घेत नाहीत. यामुळे लोक व्यवस्थित काम करू शकत नाहीत आणि कुटुंबाला त्यांची काळजी घ्यावी लागते. मधुमेह हा आता केवळ एक आजार नाही तर एक मोठे सामाजिक आणि आर्थिक संकट आहे.