Disadvantages of talking while Eating: जेवताना का बोलू नये? आहारतज्ञांनी सांगितलं खरं कारण
Marathi January 20, 2026 08:25 PM

तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की घरातील मोठी मंडळी जेवत असताना न बोलण्याचा सल्ला देतात. पण आपल्याला यामागचे नेमके कारण माहित नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण वडीलधारी मंडळींचा सल्ला ऐकून खरंच जेवताना का बोलू नये? असा प्रश्न पडतो. आहारतज्ञांनी याबाबत काय सांगितले आहे ते जाणून घेऊया.. ( Why we should not talk while eating? )

जेवताना का बोलू नये?
आहारतज्ञांच्या मते, अन्नाचे पचन तोंडातून सुरू होते. जेवताना जेव्हा आपण बोलतो तेव्हा अन्न कमी प्रमाणात चावले जाते आणि पोटात त्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. न चावलेले अन्न पोटात गेल्यावर पचनसंस्थेवर ताण येतो. त्यामुळे पोटफुगी, गॅस, आम्लता आणि अपचन यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

हे होतात परिणाम

  • जेवताना बोलल्याने अन्नासोबत पोटात जास्त हवा प्रवेश करते. परिणामी यामुळे जास्त ढेकर येऊ शकते. शिवाय अन्न घशात अडकण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते.
  • जेवताना बोलल्याने मज्जासंस्थेचे कार्य बिघडते. यामुळे मेंदूला एकाच वेळी दोन कामे करण्याची गरज पडते. अन्न चावणे आणि बोलणे. शिवाय बोलण्याच्या ओघात आपण किती खातोय याचे भान राहत नाही. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
  • जेव्हा आपण बोलतो, तेव्हा श्वसननलिकेचे द्वार उघडे राहते. जेवताना बोलल्यास अन्नाचा कण चुकून श्वसननलिकेत जाऊ शकतो. यामुळे ठसका लागणे, श्वास गुदमरणे किंवा गंभीर परिस्थितीत गुदमरून मृत्यू होण्याचाही धोका असतो.

हेही वाचा: Healthy Habbits: पन्नाशीनंतर पाळा ‘या’ आरोग्यदायी सवयी; राहाल फिट अँड फाईन

शांतपणे जेवल्यावर काय होते?
आहारतज्ञांच्या मते, शांतपणे आणि एकाग्रतेने जेवण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे लाळेचा प्रवाह सुधारतो, ज्यामुळे पचन होण्यास मदत होते. शिवाय, शरीर अन्नातील आवश्यक पोषक तत्वे अधिक प्रभावीपणे शोषून घेते आणि चयापचय देखील सुधारते. मौन पाळून किंवा किमान बोलून जेवल्यास अन्नाचे पचन चांगले होते आणि आपण अन्नाचा खऱ्या अर्थाने आस्वाद घेऊ शकतो.

( Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.