पाकिस्तानी खेळाडूने असा झेल पकडल्याने क्रीडाप्रेमींना बसला आश्चर्याचा धक्का, Video
Tv9 Marathi January 20, 2026 09:45 PM

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबियात सुरू आहेत. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने शेवटच्या टप्प्यात आहेत. या स्पर्धेत प्रत्येक संघ विजयासाठी जोर लावताना दिसत आहे. भारत आणि बांग्लादेश वनडे सामना देखील चर्चेचा विषय ठरला. कारण या सामन्यात भारताने विजयासाठी दिलेलं आव्हान खूपच कमी होतं. असं असूनही भारताने फिल्डिंगच्या जोरावर हा सामना जिंकला. भारताने फिल्डिंगमध्ये कमाल दाखवत आतापर्यंत अनेक सामन्यात विजय मिळवला आहे. पण याचा उलट चित्र पाकिस्तान संघात पाहायला मिळतं. सुमार क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानने जगभरात नाचक्की केली आहे. मग स्पर्धा कोणतीही असो पाकिस्तान खेळाडूंचं फिल्डिंगशी वाकडंच आहे. पण अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एक खेळाडूने पकडलेल्या झेलमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. असं कसं झालं याबाबत आता चर्चांना उधाण आलं आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर स्कॉटलँडला पराभूत करत पाकिस्तानने कमबॅक केलं. या सामन्यात पाकिस्तानने फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल केली. इतकंच काय तर क्षेत्ररक्षणातही कमाल केली. या सामन्यात खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात पाकिस्तानची लाज राखली. एका वेगळ्या शैलीत पाकिस्तानचे खेळाडू दिसले. स्कॉटलँडविरुद्धच्या सामन्यात अहमद हुसैनने जबरदस्त झेल घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. स्कॉटलँडच्या डावातील 46 व्या षटकात अप्रतिम झेल पकडला.

Superman who. Catch of the tournament.U19 World cup. 🔥 #U19WorldCup pic.twitter.com/ulSXiCQ3FJ

— Faaru (@FaaruSays)

मोहम्मद सय्याम गोलंदाजी करत होता. या षटकात स्कॉटिश फलंदाज मनु सारस्वतने उत्तुंग फटका मारला. चेंडू वर चढला आणि लाँग ऑफच्या दिशेने गेला. यावेळी शॉर्ट थर्डमॅनला उभा असलेल्या अहमद हुसैन मागच्या बाजूला धावा घेतली. तसं पाहीलं तर हा झेल होणार नाही असंच सर्वांना वाटत होतं. पण त्याने त्या चेंडूवर नजर खिळवून ठेवली आहे. शेवटच्या क्षणी उडी घेत अप्रतिम झेल पकडला. या झेलमुळे सारस्वतचा डाव 25 धावांवर आटोपला. तसेच स्कॉटलँडच्या धावगतीला ब्रेक लागला. पाकिस्तानला फक्त 187 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान पाकिस्ताने 43.1 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.