Actress Shocking Statement: मला फक्त बेडवर पुरुष हवा, आयुष्यात नाही...; 54 वर्षीय 'या' सिंगल अभिनेत्रीने केलं धक्कादायक विधान
Saam TV January 20, 2026 09:45 PM

Tabu Shocking Statement: बॉलीवूड अभिनेत्री तब्बू ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने व्हायरल होत असते. स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाणाऱ्या तब्बूला प्रत्येक मुद्द्यावर तिचे मत व्यक्त करायला आवडते. ५४ वर्षांची असतानाही, तब्बू सिंगल आहे. अनेक मुलाखतीत तिला विचारतात की ती कधी लग्न आहे. दरम्यान, बॉलीवूडची बोल्डनेस क्वीन तब्बू हिचे एक विधान इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. तब्बूने लग्नाबद्दल असे काही म्हटले आहे की नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.

तब्बूने लग्नाबद्दल 'हे' विधान केले

एक्स (पूर्वी ट्विटर) आणि इंस्टाग्रामवर काही पोस्ट व्हायरल होत आहेत. यामध्ये तब्बूचे धक्कादायक विधान आहे. या पोस्टनुसार, तब्बू म्हणाली, "मला फक्त बेडवर एक पुरूष हवा आहे. मी आत्ता लग्न करणार नाही; मी सिंगल लाईफ एन्जॉय करत आहे." टेलीचक्करनेही त्यांच्या इंस्टाग्रामवर अशीच एक पोस्ट पोस्ट केली. आता, तब्बूने खरोखरच हे सांगितले की नाही यावर सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे.

Akshay kumar car Accident: अक्षय कुमारच्या कारमुळे झालेल्या अपघातात रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर; भावाची खिलाडीकडे मोठी मागणी

या व्हायरल विधानानंतर एक्सवर एक ट्विट समोर आले आहे यामध्ये तब्बूच्या टीमने हे विधान खोटे असल्याचे म्हटले आहे. शिवाय, तब्बूने लग्नाबद्दल असे विधान करतानाचा कोणताही व्हिडिओ समोर आलेला नाही. पण, तब्बूने अद्याप या मुद्द्यावर मत व्यक्त केले नाही.

Neha Kakkar Divorce: लग्नाच्या ५ वर्षांनंतर नेहा कक्करचा होणार घटस्फोट? म्हणाली, "माझा नवरा..."

तब्बूने अजून लग्न केलेले नाही

बॉलीवूड अभिनेत्री तब्बूने अजून लग्न केलेले नाही. जरी तिचे नाव अनेक स्टार्सशी जोडले गेले असले तरी ती सिंगल आहे. तब्बू सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांसह वारंवार फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. तब्बूची प्रत्येक पोस्ट ऑनलाइन व्हायरल होते. तब्बू शेवटची 'क्रू' चित्रपटात दिसली होत. लवकरच ती 'दृश्यम ३' मध्ये दिसणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.