Devmanus: इन्स्पेक्टर जामकर गोपाळला आर्याच्या मृतदेहासह रंगेहाथ पकडणार? 'देवमाणूस' मालिकेत येणार धक्कादायक ट्विस्ट
Saam TV January 20, 2026 09:45 PM

Devmanus Marathi Serial: झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिका सतत धक्कादायक वळण येत आहे आणि आता मालिकेत नवा ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे दोन भाग खूपच गाजले. तसेच या तिसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या भागात गोपाळचं कारस्थान उघडकीस येणार असल्याचं प्रोमोमधून दिसून आलं आहे.

या मालिकेच्या आगामी प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की गोपाळने आर्याच्या खूनाचा कट रचला आहे आणि तो तिचा मृतदेह घेऊन निघतो आहे. प्रोमोमध्ये दाखवलं आहे की गावातले लोक नरकी हडळ उत्सवात गायब झालेल्या आर्याचा शोध घेत आहेत, पण तिथे काहीही मिळत नाही. नंतर अचानक गोपाळ आर्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढताना दिसतो. तो स्वतःशी म्हणतो, “आधी या बॉडीची विल्हेवाट लावायला पाहिजे.”

Akshay kumar car Accident: अक्षय कुमारच्या कारमुळे झालेल्या अपघातात रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर; भावाची खिलाडीकडे मोठी मागणी

त्यानंतर गोपाळ हा मृतदेह एका गाडीत ठेवतो आणि निघण्याचा प्रयत्न करतो. या वेळी, इन्स्पेक्टर जामकर त्याची गाडी थांबवतो आणि गोपाळला विचारतो की गाडीत काय आहे. जामकरला संशय वाटत असून तो स्वतः गाडीत काय आहे ते पाहण्याचा आग्रह धरतो. प्रोमोमध्ये जामकर गाडीकडे येताना दिसतो, त्यामुळे तो खरोखरच गोपाळला आर्याच्या मृतदेहासह पकडेल की नाही याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Neha Kakkar Divorce: लग्नाच्या ५ वर्षांनंतर नेहा कक्करचा होणार घटस्फोट? म्हणाली, "माझा नवरा..."
View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)