Gautam Gambhir Viral Video Kohli Reaction: इंदूरमध्ये फलंदाजी ढासळल्याने भारताला तिसरा आणि अखेरचा एकदिवशीय सामना गमवावा लागला. टीम इंडियाच्या पराभावानंतर या स्टेडियममध्ये भारतीय कोच गौतम गंभीर यांच्या नावाने हाय हायचे नारे देण्यात आले, असा दावा केल्या जात आहे. याविषयीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. ही मालिका गमावल्याने क्रिकेट चाहते संतापले आहेत. त्यातूनच हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. पण विराट कोहलीच्या रिॲक्शनवरुन याविषयीचे सत्य समोर आले आहे. वनडे सीरिजमध्ये न्युझीलँडने 2-1 अशी मालिका खिशात घातली.
व्हिडिओ नाही खरा, काय सत्य?
कीवी संघाने भारतात एकदिवशीय मालिका जिंकली. टीम इंडियाचा सलग विजयाची परंपरा खंडित केले. भारताच्या या ऐतिहासिक पराभवानंतर कोच गौतम गंभीरविषयीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू आहे. यामध्ये इंदूर स्टेडियमवर चाहते गौतम गंभीर हाय हाय, अशी नारेबाजी करत असल्याचे समोर येत आहे. पण हा व्हिडिओ खरा नसल्याचे उघड झाले आहे. तर हा व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
‘Gautam Gambhir हाय-हाय’ व्हिडिओचे सत्य काय?
या व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली, कोच गौतम गंभीर, श्रेयस अय्यर, हर्षित राणा आणि केएल राहुलसह इंदूर स्टेडियममध्ये जाताना दिसत आहेत. त्याचवेळी गंभीर हाय हाय असे नारेबाजी ऐकू येते. या व्हिडिओ चाहत्यांच्या स्टँड्सकडून हा आवाज असल्याचे दिसते. त्याकडे सर्वच खेळाडूंचे लक्ष जाते. ही नारेबाजी ऐकून स्टार फलंदाज विराट कोहलीला पण चांगले वाटत नाही. त्यावेळी कोहली हा त्याच्या सहकाऱ्याशी बोलत त्या चाहत्यांकडे पाहताना आणि काही इशारा करताना या व्हिडिओत दिसतो.
व्हिडिओ एडिट केलेला
हा व्हिडिओ जुना असल्याचे समोर येत आहे. विराट कोहलीच्या त्या प्रतिक्रियेवरून हा व्हिडिओ जुना असून त्यात ऑडियो मिक्स केल्याचे समजते. या व्हिडिओत गंभीर हाय हाय असा ऑडिओ नंतर जोडल्याचे समोर येत आहे. हा ऑडिओ दुसऱ्या कोणत्या तरी व्हिडिओतून उचलून या व्हिडिओला जोडण्यात आला आहे आणि तो सामना गमावल्यानंतर विविध समाज माध्यमांवर शेअर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत गुवाहाटी येथे झालेल्या कसोटी सामन्यात चाहत्यांनी गंभीरविरोधात नारेबाजी केली होती. आता या व्हिडिओत हा ऑडिओ जोडण्यात आला आहे. इंदूरच्या स्टेडियमवर असा प्रकार घडल्याची पुष्टी अद्याप कोणत्याच माध्यमांनी केलेली नाही. त्यामुळे गौतम गंभीरला प्रेक्षकांनी त्रास दिल्याचे अद्याप समोर आलेले नाही.