ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर छोटे मोठे मतभेद होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. कारण बऱ्याचवेळा ऑफिसमध्ये काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे असे मतभेद होत असतात. हे मतभेद लगेचचं तिथल्या तिथे विसरणेही आवश्यक असते. कारण जर या मतभेदाच रुपांतर मनभेदात झाले तर सहकाऱ्यांबरोबरच्या मैत्रीत अंतर यायला लागते. एकमेकांबरोबर बोलणं, समोरा समोर येणं टाळलं जातं. पण या दोन सहकाऱ्यांमधील वादाचा परिणाम त्यांच्या कामावरच होत नाही तर त्याचा परिणाम त्यांच्या खासगी आयुष्यावरही होतो. जर तुमच्याही बाबतीत असेच काही होत असेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे.
अभाव म्हणाला
ऑफिस हे कामाचे ठिकाण आहे. यामुळे येथे गप्पा मारण्यापेक्षा कामात लक्ष असणे गरजेचे असते. पण काहींना एका जागी जास्त वेळ बसणे जमत नाही. त्यांना इकडचं तिकडे करण्याची, गप्पा मारण्याची सवय असते. यामुळे ते तुमच्याकडून दुसऱ्यांची माहीती तर मिळवतातच पण दुसऱ्याला तुमचीही माहीती देत असतात. असे करण्यात त्यांना आनंद मिळतो. पण असे वागणे चुकीचे आहे. यामुळे अशा व्यक्तीशी कमी बोला. त्यामुळे मतभेदाचा प्रश्नच येणार नाही.
सन्मान
ऑफिसमध्ये काम करणारा शिपाई असो की चहावाला .तुम्ही सगळ्यांबरोबर सन्मानाने बोलावे. त्यामुळे तुमच्याबद्दल सगळ्यांच्याच मनात आदर निर्माण होईल. कामाचा दर्जा पाहून कोणालाही कमी लेखू नका. जर तुम्ही त्याला अपमानास्पद वागणूक दिलीत तर त्याच्या मनातही तुमच्या बद्दल द्वेष निर्माण होईल. त्यामुळे सगळ्यांशीच सन्मानाने वागा.
मदत
जर तुमच्या एखाद्या सहकाऱ्याला कामात तुमची मदत हवी असेल तर नाही म्हणू नका. त्याची मदत करा. उगाचाच तुम्ही फारच बिझी आहात असे दर्शवू नका. नाहीतर त्याच्या मनात तुमची कायमची निगेटीव्ह छवी तयार होईल. त्यामुळे मनभेद तयार होईल.
मोठेपणा करू नका
कामाच्य ठिकाणी कधीही मोठेपणा किंवा मीच किती शहाणा हे दाखवण्याचा प्रयत्न करु नये. जरी तुम्हांला त्या कंपनीत काम करून अनेक वर्ष झालेली असतील तरी मला सगळच येतं या थाटात वावरू नये. त्यातून तुमच्या अहंकाराचे प्रदर्शन होते. मतभेद होतात.