अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर सध्या ग्रीनलँड आहे. ग्रीनलँडला मोठ्या धमक्या देताना डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. हेच नाही तर अमेरिका कधीही आणि कोणत्याही क्षणाला ग्रीनलँडवर हल्ला करू शकते. यादरम्यानच आता घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे बघायला मिळत आहे. युद्धाची तयारी सुरू असून कोणत्याही क्षणी युद्धाची आग पेटू शकते. मागील काही दिवसांपासून अमेरिका छोट्या छोट्या देशांवर हल्ले करून कब्जा मिळवताना दिसत आहे. इराणविरोधात अमेरिका उतरल्याचे बघायला मिळाले. मात्र, इराणच्या आक्रमक भूमिकेनंतर अमेरिकेने आपला मोर्चा हा थेट ग्रीनलँडकडे वळवला. अमेरिका आणि ग्रीनलँडमधील तणाव प्रचंड वाढला. अमेरिकेच्या सततच्या धमक्यांना भीक न घालता थेट युद्धासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रीनलँडकडून युद्धाची तयारीही सुरू झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काही धक्कादायक निर्णय घेतली जात आहेत, ज्यामुळे जग युद्धाच्या उंबरठ्यावर आलंय.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने सांगितले जात आहे की, सुरक्षा कारणांमुळे अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रीनलँडवर ताब्या घेणे आवश्यक आहे. मात्र, याला ग्रीनलँडचा विरोध आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेकडून शेजारी देशांवर वेगवेगळी कारणे देऊन अतिक्रमण केले जात आहे.
नीलसन यांनी यादरम्यान बोलताना म्हटले की, सैन्य संघर्ष होण्याची शक्यता तशी फार जास्त कमी आहे. पण आपण त्याला पूर्णपणे नकारही देऊ शकत नाहीत. हेच नाही तर ग्रीनलँड सरकारने यासंबंधित अधिकाऱ्यांचे टास्क फोर्स देखील तयार केली आहे. यामाध्यमातून विविध उपायोजना केल्या जातील आणि घरात किमान 5 दिवसांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासारख्या शिफारसी त्यात आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचे मिशन आता ग्रीनलँड असल्याचे जवळपास स्पष्टच आहे. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या हद्दीत अमेरिकेची झेंडाचा फोटो शेअर केल्याने मोठी खळबळ उडाली. यासोबतच त्यांनी हा फोटो शेअर करत थेट लिहिले होते की,ग्रीनलँड अमेरिकेी हद्द 2026… डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या या फोटोमुळे मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात ग्रीनलँडला अमेरिकेच्या ताब्यात घेण्याची इच्छा यापूर्वीच व्यक्त केली आहे. ग्रीनलँडच्या मुद्द्यात डेनमार्क, फ्रांन्स आणि ब्रिटेन यांच्यासोबतच युरोपियन देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या पावरचा वापर करत थेट म्हटले की, जे देश या मुद्द्यात त्यांची साथ देणार नाहीत, अशा देशांवर डोनाल्ड ट्रम्प थेट टॅरिफ लावतील, ज्यामुळे जगात एक खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.