अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेतून रवाना झाल होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाने दावोसकडे उड्ढाण घेतली आणि मोठ्या घडामोडी घडल्या आणि थेट काही मिनिटात हे विमान पुन्हा अमेरिकेत परतले. ज्यामुळे जगात मोठी खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावोसचा नियोजित दाैरा होता. गेल्या काही दिवसांपासून या दाैऱ्याची तयारीही सुरू होती. मात्र, अचानक असे काही घडले की, थेट त्यांना काही मिनिटाच अमेरिकेत परतावे लागले. सध्या अमेरिकेचा इराण आणि ग्रीनलँडसोबतचा तणाव चांगलाच वाढला आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकते. इराण आणि ग्रीनलँडकडून युद्धाची तयारी सुरू आहे. जर अमेरिकेने हल्ला केलाच तर आम्ही देखील सडेतोड उत्तर देऊ अशी भूमिका दोन्ही देशांची आहे. त्यामध्येच काही वेळापूर्वी इराणने थेट डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी देत म्हटले की, आमच्या नादी लागू नका… नाही तर अख्ये जग आम्ही नष्ट करू…
डोनाल्ड ट्रम्प या महत्वाच्या घडामोडी दरम्यान थेट स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले होते. मात्र, उड्डाणानंतर थोड्याच वेळात त्यांच्या एअर फोर्स वन या विशेष विमानात बिघाड झाल्याचे कारण देत ते परतले. याबाबत व्हाईट हाऊसने देखील माहिती दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान तात्काळ मेरीलँडमधील जॉइंट बेस येथे उतरवण्यात आले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या विमानाने दावोसकडे रवाना होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याने विमान परतल्याचे व्हाईट हाऊसने जरी सांगितले असेल तरीही संशय व्यक्त केला जात आहे. इराण आणि ग्रीनलँडसोबतच्या तणावात डोनाल्ड ट्रम्प परतल्याचे सांगितले जात आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान अत्यंत आधुनिक आणि खास आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अशाप्रकारचा बिघाड अचानक येणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प अचानक काही मिनिटात अमेरिकेत परतल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
काहीतरी मोठे आणि भयंकर घडत असल्याचा दावा देखील केला जात आहे. ग्रीनलँडच्या मुद्द्यात अमेरिकेची साथ न देणाऱ्या काही देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट 10 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामध्येच आता अमेरिकेमधील घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेकडे सध्या संपूर्ण जगाच्या नजरा असल्याचे बघायला मिळत आहे.