आज शिवसेना कुणाची? शिवसेनेचं चिन्ह कुणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र, ही सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. उद्धव ठाकरेंच्याच बाजूने निर्णय लागेल, असा विश्वास ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केला होता. शिंदेंना आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करायला लागेल, असा दावाही सरोदे यांनी केला होता.. मात्र या सुनावणीनंतर महाराष्ट्रामध्ये गणित बदलतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत उत्तर दिलंय. गणितं बदलू शकत नाही, पण चित्र नक्कीच बदलेल, असं सूचक विधान राऊत यांनी केलंय.