'जवान' चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
अॅटली आता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे.
अॅटलीने बायकोसोबत फोटो शेअर करून आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात चित्रपट निर्माते अॅटलीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नेहमी आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहणारा अॅटली आता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अॅटलीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अॅटली आता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याने बायकोसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
View this post on InstagramA post shared by Atlee Kumar (@atlee47)
अॅटलीनेशेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याची बायको बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तर त्याचा पहिला मुलगा देखील दिसत आहे. फॅमिली फोटो खूपच क्यूट आहे. या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. सेलिब्रिटी कमेंट करून त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छादेत आहेत. अॅटलीने पोस्टला खूप खास कॅप्शन दिलं आहे.
पोस्टचे कॅप्शन"आमच्या कुटुंबातील नवीन सदस्याच्या आगमनाने आमचे घर आणखी cozier होणार आहे!
होय! आम्ही पुन्हा एकदा pregnant आहोत...
तुमचे आशीर्वाद, प्रेमआणि प्रार्थनांची गरज आहे...
खूप प्रेम...
अटली, प्रिया, मीर, बेकी, युकी, चॉकी, कॉफी आणि गूफी ..."
View this post on InstagramA post shared by Priya Mohan (@priyaatlee)
अॅटलीच्या बायकोचे नाव प्रिया आहे. त्यांनी 2014ला लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2023 ला त्यांनी आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. ज्याचे नाव मीर आहे आणि आता 2026 मध्ये दोघे आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहे. अॅटली साऊथ मधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने आजवर अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. शाहरुख खान 'जवान' चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
Bigg Boss Marathi 6 : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते राधा मुंबईकर; बिग बॉसच्या घरात दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंड आहे तरी कोण?