Hafiz Saeed at Lashkar Camp : पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली असून त्यामुळे जगात पुन्हा मोठी खळबळ माजली आहे. पाकिस्तानातील मुलतानमध्ये एक नवीन इमारत, म्हणजेच लष्कराचा एक नवीन तळ बांधला जात आहे. सध्या त्याचे बांधकाम सुरू असून तिथे एका व्यक्तीच्या उपस्थितीने सर्वांनाच धक्का बसला. कुख्यात दहशतवादी हाफिड सईद हा त्या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी तळाच्या बांधकामाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमात हाफिज सईद दिसला. एवढंच नव्हे तर तिथे पोहोचल्यावर त्याने पाया खोदला तसेच तो बांधकामाच्या सुरुवातीच्या कामातही सहभागी होऊन प्रार्थना करताना स्पष्टपणे दिसला.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, हाफिज सईदचे हे फोटो समोर आले असून त्यात तो स्पष्टपणे काम करताना, प्रार्थना करताना दिसत आहे. हाफिज सईद हा लष्करचा तोच दहशतवादी आहे ज्याने आत्मघातकी बॉम्बर्सची फौज तयार करण्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानला याची जाणीव असून ते बराच काळ भारताविरुद्ध त्याचा वापर करत आहेत. पाकिस्तान आपल्या भूमीवर दहशतवादाचा कारखाना कसा चालवत आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना वाढविण्यासाठी कर्जामागून कर्ज देण्यास तयार आहे हे संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी असे फोटो पुरेसे आहेत.
कोण आहे हाफिज सईद ?
– हाफिज सईद हा भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्याच्या लिस्टमध्ये आहे. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही तो मास्टरमाइंड आहे.
– हाफिज सईद हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड देखील आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि दहशतवादी गटांना निधी पुरवणे यासह अनेक प्रकरणांमध्ये एनआयएने त्याचे आरोपी म्हणून नाव दिले आहे.
– भारताव्यतिरिक्त, इतर अनेक देशांनी हाफिज सईदला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. लष्कर-ए-तैयबा ही हाफिज सईदची दहशतवादी संघटना आहे. या दहशतवादी संघटनेवर अंदाजे 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस आहे. हाफिज सईदला दहशतवादी निधी प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला आहे.
मुनीरच्या पार्टीचे आयोजन करणारा गुन्हेगार
अमेरिकेने हाफिज सईद आणि त्याच्या संघटनेवर बक्षीसही जाहीर केले आहे. अमेरिकन सरकारच्या रिवॉर्ड्स फॉर जस्टिस प्रोग्राम वेबसाइटवर असे म्हटले आहे की हाफिज सईद हा बंदी घातलेल्या जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख आणि लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी गटाचा संस्थापक आहे. हाफिज सईदचा समावेश अमेरिकेच्या जागतिक “दहशतवाद्यांच्या गुन्हेगारांच्या” यादीत आहे. 2012 सालापासून, अमेरिकेने त्याच्यावर 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.