उत्रौली, ता. २१ : उत्रौली (ता. भोर) येथील श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी (ता. २०) होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये पल्लवी शिवतरे या विजयी झाल्या.
या स्पर्धेस थंडीला न जुमानता महिलांनी उदंड प्रतिसाद देत, विनोद, उखाणे, धमाल करीत आपल्या बुद्धिमत्ता, कल्पकता, कौशल्याचा वापर करून स्पर्धा जिंकण्यासाठी खेळीमेळीच्या वातावरणात चढाओढ करीत खेळाचा आनंद लुटला.
मनोरंजक खेळांमुळे महिलांना रोजच्या कामातून थोडा विरंगुळा मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर डाळ यांनी केले.
मंडळाचे यंदा ५०वे वर्ष असून, वर्षभर वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याचे मंडळाचे वतीने सांगण्यात आले.
विजेत्या महिलांची नावे (कंसात भेट वस्तू)
पल्लवी शिवतरे (पैठणी), सुवर्णा भोईटे (गॅस शेगडी), रश्मी संकपाळ (मिक्सर), राणी शिवतरे (टेबल फॅन), शीतल शिवतरे (कुकर), राणी संकपाळ (डिनर सेट), इंदू शिवतरे (मॉप), मंदा तळेकर (इस्त्री), पुनम येडवे (नेरलेप तवा), नंदा शिवतरे (टिफिन बॉक्स), कोमल शिवतरे (कप बशी सेट), तसेच उत्तेजनार्थ- प्रिया शिवतरे, सविता शिवतरे, मेघा शिवतरे यांना घड्याळ देण्यात आले.
00190