रेडी येथे आज गणेश जयंती
esakal January 22, 2026 10:45 AM

रेडी येथे आज
गणेश जयंती
सावंतवाडी ः रेडी येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव उद्या (ता. २२) उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मंदिरात सकाळी ६ वाजता गणेश मूर्तीवर अभिषेक, सकाळी ८.३० वाजता सत्यविनायक पूजा, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत स्थानिक भजने होणार आहेत. गणेशभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
..........................
कणकवलीत रविवारी
‘एआय’ कार्यशाळा
कणकवली ः गोपुरी आश्रमाच्या जीवन शिक्षण शाळेच्यावतीने रविवारी (ता. २५) सकाळी ८३० ते दुपारी १२ या वेळेत ‘एआय आणि अभ्यास व अभ्यासातील एआय’ विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे. गोपुरीच्या गणपतराव सावंत सभागृहात होणाऱ्या या कार्यशाळेला शिरगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य तज्ज्ञ मार्गदर्शक शमशुद्दीन अत्तार मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत पहिली ते नववीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी वही, पेन, पॅड व पाणी बॉटलसह उपस्थित राहावे. कार्यशाळेत सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी विनायक सापळे, अर्पिता मुंबरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.........................
कणकवलीत आज
गणेश जयंती उत्सव
कणकवली ः कणकवली येथील प. पू. देवी अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात उद्या (ता. २२) गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता गणेश मूर्तीवर अभिषेक, भजनी बुवा सुनील राणे (बांधकरवाडी-कणकवली) यांचे भजन, दुपारी १२ वाजता श्री गणेश जन्मसोहळा, देवी अनुसया माता विश्रांतीधाम ते राम मंदिर, स्वयंभू मंदिरपर्यंत गणेश पालखी मिरवणूक, १.३० वाजता आरती, महाप्रसाद, सायंकाळी ७.३० वाजता बुवा उदय राणे (जानवली) यांचे भजन, शेज आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.
......................
गोव्यात एप्रिलमध्ये
‘बेतकर चषक’ स्पर्धा
सावंतवाडी ः शापोरा-गोवा येथील बेतकर टॉफी क्रिकेट स्पर्धा ७ ते ११ एप्रिलदरम्यान होणार आहे. दिवसरात्र होणारी ही टेनिस बॉल स्पर्धा गोवा, सिंधुदुर्ग मर्यादित तालुकापातळीवर होणार आहे. प्रथम विजेत्याला ५,००,०२८, द्वितीय २,५०,०२८, उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी ६०,००८ व चषक देणार आहेत. ‘मालिकावीर’साठी नामांकित मोटार, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना दुचाकी देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या १६ संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
.....................
तळेखोलवाडीत आज
धार्मिक कार्यक्रम
कणकवली, ः तळेखोलवाडी येथील श्री गणेश मंदिरात उद्या (ता. २२) विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ८ वाजता महाअभिषेक, सत्यनारायण महापूजा, महाआरती, महाप्रसाद, हळदीकुंकू, निमंत्रित भजन मंडळांची भजने, रात्री ९.३० वाजता आई भगवती कला दिंडी भजन (तोरसोळे) यांचा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन ओंकार प्रासादिक मंडळाने केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.