Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐरो सूर्यकिरण शोचे आयोजन
Saam TV January 22, 2026 08:45 PM
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐरो सूर्यकिरण शोचे आयोजन

नाशिक जिल्हा प्रशासन आणि भारतीय वायुदलाच्या माध्यमातून आयोजन

गंगापूर धरणाच्या पाण्यावर आकाशात वायुसेनेच्या लढाऊ विमानांच्या विविध कसरती आणि आकाशात साकारणार तिरंगा

मंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, वायुदल, सैन्य दल, पोलीस अधिकारी उपस्थित

एकावेळी तीस हजार नाशिककरांना एरो शो पाहण्याची गंगापूर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात व्यवस्था

Mumbai Goa Expressway: मुंबई गोवा महामार्गावर सिलेंडरने भरलेल्या टेम्पोने घेतला पेट

मुंबई गोवा महामार्गावर सिलेंडरने भरलेल्या छोट्या पिकअप टेम्पोने घेतला पेट

आगीत सिलेंडर चे एकामागोमाग स्फोट

मुंबई गोवा महामार्गावरील पेण जवळील असणाऱ्या वाशी नाका परिसरातील घटना

महामार्गावर भितीचे वातावरण

वाहनातील इंधन लिक झाल्याने अचानक घेतला पेट

अग्निशमन दलाल पाचारण

वाहनातील 8 सिलेंडर सह वाहन जळून खाक

Shahapur: शहापूरजवळ भीषण अपघात; अज्ञात ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू..

राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील शहापूर येथील MIET कॉलेजसमोर रात्री एका भीषण अपघातात ३७ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. एका अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेत दुचाकी चालक असलेला महिलेचा भाऊ देखील जखमी झाला आहे.राणू ऊर्फ अंजुम बबलू शेख (वय ३७, रा. नेहरू वार्ड, मोहाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आशिक अली सैय्यद (वय ४३, रा. दत्तवाडी, नागपूर) हे या अपघातात जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,आशिक अली सैय्यद हे आपल्या मोपेड गाडीने त्यांची आतेबहीण राणू शेख यांच्यासह शहापूरकडून भंडाऱ्याच्या दिशेने जात होते.रात्रीच्या सुमारास MIET कॉलेजसमोर मागून येणाऱ्या एका अज्ञात निळ्या रंगाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात कट मारला.धडक इतकी भीषण होती की, आशिक अली गाडीसह रस्त्याच्या पलीकडे फेकले गेले, तर राणू शेख या ट्रकच्या चाकाखाली आल्या. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक जखमींना मदत करण्याऐवजी ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला.पोलीस सध्या फरार ट्रक चालकाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

आज अमरावतीच्या महापौर पदाचं आरक्षण...

राज्यातील 29 महानगरपालिकाच्या महापौर पदाचं आरक्षण आज निघणार ज्यात अमरावतीचाही समावेश आहे.. मागील चार वर्षांपासून अमरावती महानगरपालिका मधील महापौर यांचं दालन आणि विद्यापीठ मार्गावरील सरकारी बंगल्याला कुकुप लागलेलं आहे.. मनपात असलेलं दालन आज चार वर्षानंतर उघडण्यात आले.. महापौर दालनाच्या खुर्चीवर कोनत्या प्रवर्गाचा महापौर बसेल हे लवकरच कळेल... अमरावती महानगरपालिका मध्ये आज कोणत्या प्रवर्गाचा महापौर राहील हे आज होणाऱ्या आरक्षणाच्या सोडतमध्ये कळेल... पण महापौरच्या खुर्चीवर महाविकास आघाडीचा की महायुतीचा महापौर बसेल हे काही दिवसात स्पष्ट होईलच पण भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महापौर त्यांचाच राहील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे....

Dharashiv: धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसची तोडफोड

धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसची तोडफोड ,सीसीटीव्हीत कारनामा कैद

तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर येत स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसची तोडफोड

बसची तोडफोड करत ईव्हीएम हटाव लोकतंत्र वाचवाचे पोम्प्लेट चिटकवले

आठवडाभरापासून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तांदूळवाडी इथ ईव्हीएम विरोधात आंदोलन

Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण ७१३ अर्ज दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधून जिल्हा परिषदेसाठी २७३, तर पंचायत समितीसाठी ४४० असे एकूण ७१३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण ५० जिल्हा परिषद गट आणि १०० पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक ६० आणि पंचायत समितीसाठी १०१ अर्ज आले असून याठीकाणी शिवसेना भाजप मध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. तर वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यात जागांच्या संख्येनुसार अर्जांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी, सर्वच जागांसाठी उमेदवारांनी उत्साह दाखवला आहे. आता उद्या 23 तारीखला अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतरच निवडणुकीत खरी रंगत येणार आहे.

Kolhapur: कोल्हापूर महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत

कोल्हापूर महानगर पालिकेच्या नव्या सभागृहातील पहिल्या महापौरपदावर कोण विराजमान होणार, याचा फैसला आज होणार आहे. महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत काढली जाणार असून, याकडे संपूर्ण कोल्हापूर शहरासह इचलकरंजीचेही लक्ष लागले आहे.

Sindhudurg: सिंधुदुर्गात थंडीसह दाट धुक्याची चादर

सिंधुदुर्गात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीने पुन्हा जोर धरला आहे. त्यातच आज ग्रामीण भागासह शहरीभागात दाट धुके पडल्याचे पाहायला मिळाले. मागील दोन तीन दिवसात थंडीही वाढली असल्याने आंबा, काजूच्या फळधारणेसाठी आणखी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र धुक्यामुळे फळांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Lonar Sarovar: लोणार सरोवरातील वाढत्या जल पातळीची उच्च न्यायालयाकडून दखल

जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाण्याची पातळी गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सातत्याने वाढत असून ही पातळी आता रेकॉर्डब्रेक स्तरावर आली आहे. लोणार सरोवरातील अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली बुडाली असून वाढत्या जल पातळीमुळे लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म ही बदलत आहे आणि यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. "साम टीव्ही" ने याविषयी रियालिटी चेक करून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता उच्च न्यायालयाकडून याची दखल घेण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्या.अनिल व न्या.राज वाकोडे यांच्या खंडपीठाने वकील म्हणून एड.मोहित खजांची यांची याप्रकरणी न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली आहे व पुढील सात दिवसात रीतसर जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे...

Kolhapur: कोल्हापुरात तीन तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाने मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्यात यशस्वी समझोता झाला आहे. कोल्हापूरात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं. या तीन तालुक्यांतील सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.

Latur: लातूरमध्ये महापौर पदासाठी मंत्रालयात आरक्षण सोडत

लातूर महापालिकेच्या महापौर पदावर कोण बसणार याकडे काही दिवसापासून अनेकांचे लक्ष लागल आहे, दरम्यान आज मुंबईच्या मंत्रालय येथे महापौर पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे , सकाळी 11 वाजता महापौर पदाची सोडत होणार असून अनेकांचे लक्ष या सोडतीकडे लागला आहे. तर लातूर महापालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची एक हाती सत्ता आल्याने नेमकं महापौर पद कोणाकडे जाणार हे देखील महत्त्वाचा आहे.

Ratnagiri: राज्यात पंचायत समितीत शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

रत्नागिरी- राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

नाणीज पंचायत समिती गणातून डाॅक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून कांबळे बिनविरोध

नाणीज पंचायत समिती गण बिनविरोध करत सामंत यांची व्युव्हरचना

आजच्या शेवटच्या दिवशी कांबळे यांच्या शिवाय एकही उमेदवारांनी अर्ज दाखल केला नाही

पद्मजा कांबळे यांचा एकमेक अर्ज निवडणुकीत आल्याने त्यांची बिनविरोध निवड

Ratnagiri: रत्नागिरी जिल्हा परिषद 256 आणि पंचायत समितीसाठी 444 उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शेवटच्या दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला. तिकीट न मिळाल्याने काही ठिकाणी बंडखोरी देखील झाली.. जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी 226 तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी तब्बल 444 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक अर्ज चिपळूण तालुक्यात दाखल झाले आहेत.

Ratnagiri: उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक निवडणूक रिंगणात

रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक निवडणूक रिंगणात

नेताजी पाटील पंचायत समिती निवडणूक लढवणार

नेताजी पाटील उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक

कसोप पंचायत समिती गणामधून नेताजी पाटील निवडणूक रिंगणात

Pune: राष्ट्रवादीचे नेते उल्हास तुपे यांच्याकडून दगडफेक; शिवसैनिक जखमी

काही दिवसांपूर्वी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारे दगडफेक करत भ्याड हल्ला केला. शिवसेनेचे हडपसरचे उपसंघटक दीपक कुलाळ यांच्यावर.. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे उल्हास तुपे यांनी त्यांच्या अंगावर स्कॉर्पिओ घालत डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चाळीस-पन्नास गुंडांची टोळी घेऊन त्यांनी या दोन ते तीन शिवसैनिकांवर हल्ला केला. त्यात शिवसेनेचे पुणे शहर उपसंघटक दीपक कुलाळ गंभीर जखमी झालेत...हा सर्व प्रकार विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसर येथे घडला...या बाबत हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल ..

राष्ट्रवादी नेते उल्हास तुपे यांनी दगडफेक केली . व मुलानी वेपण लावल्याचा आरोप कुलाल यांनी केला आहे.

अमरावती महानगरपालिकेत युवा स्वाभिमान पार्टीच्या गटनेतेपदी ज्ञानेश्वर उर्फ नाना आमले यांची निवड

अमरावती महानगरपालिकेत युवा स्वाभिमान पार्टीच्या गटनेतेपदी ज्ञानेश्वर उर्फ नाना आमले यांची सर्वानुमते निवड...

युवा स्वाभिमान पार्टीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय.

राष्ट्रीय अध्यक्षांकडून नाना आमले यांच्या नावाची शिफारस.

नगरसेवक प्रशांत वानखडे यांचे अनुमोदन, सर्वांचा एकमुखी पाठिंबा.

आमदार रवि राणा यांचा मुंबईवरून फोनद्वारे अभिनंदन;सर्व नगरसेवकांना एकजुटीने काम करण्याच्या सूचना.

महानगरपालिकेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याचा निर्धार.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या लॉकर चोरीचा छडा,चौघांना अटक

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आटपाडी तालुक्यातल्या शाखेत झालेल्या चोरीचा सांगली पोलिसांनी अखेर छडा लावला आहे.चौघांना अटक करत सव्वातीन कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.या प्रकरणी उत्तर प्रदेश मधून एका संशयितासह स्थानिक तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.9 जानेवारी रोजी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील 22 लॉकर गॅस कटरने फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना घडली होती,या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती,अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने प्रकरणी सखोल तपास करत एका मोठ्या चोरीचा छडा लावला आहे.संशयित आरोपीं मध्ये असणाऱ्या पलूस तालुक्यातील एका गलाई कामगाराने या चोरीचा प्लॅन आखल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Bhandara: भंडाऱ्यात पशुसंवर्धन विभागात दुधाळ जनावरांच्या वाटपात मोठा घोटाळा उघड...

ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी विशेष घटक योजनेअंतर्गत खर्च केला. लाखांदूर तालुक्यात अनेक गरजू लाभार्थ्यांना दुधाळ गायी आणि म्हशींचे वाटप करण्यात आले. कागदावर ही जनावरं 'उच्च जातीची' आणि 'भरपूर दूध देणारी' असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जनावरांची खरेदी करताना नेमक्या कोणत्या निकषांचा वापर करण्यात आला? यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांचे संगनमत आहे का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

वैभववाडी पंचायत समितीत भाजपचा उमेदवार बिनविरोध

वैभववाडी पंचायत समितीत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने कोकीसरे मतदारसंघातून भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या पत्नी साधना सुधीर नकाशे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपने वैभववाडी पंचायत समितीत आपले खाते खालले आहे. हा विजय केलेल्या विकास कामांचा विजय असल्याची भावना यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी व्यक्त केली आहे.

Pune: पुण्यात ११० ब्लॅक स्पॉट

पुण्यात ११० ब्लॅक स्पॉट

हडपसर, कात्रज,वारजे परिसरात धोकादायक ठिकाणे

शहरात रस्ते वाहतुकीचा वेग वाढत असताना अपघातांचा धोका ही वाढत चालला आहे

वाहतूक पोलिस आणि प्रशासनाने याकडे गांभरियाने लक्ष देण्याची गरज आहे

महामार्गावर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक

Dagdusheth Ganpati Mandir: माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

आज माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे.

या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही जोरदार तयारी करण्यात आली आहे.

गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

दगडूशेठ गणपतीचा मुख्य गणेशजन्म सोहळा यंदा सुवर्ण पाळण्यात पार पडणार आहे.

या निमित्ताने दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिरात मोठी गर्दी केली.

Nagpur: नागपूर शहरातील 171 चौकावर असणार एआयची नजर..

शहरातील वाहतूक कोंडी, नियमतोडणाऱ्यावर आणि अपघातावर आळा घालण्यासाठी मनपाकडून इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या अत्याधुनिक एआय आधारित प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार..

या माध्यमातून शहरातील 171 चौकात एआयचा पहारा असणार.

मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी पोलिस कमांड कंट्रोल सेंटर आणि लेडीज क्लब चौक येथे प्रतक्ष पाहणी करत आढावा घेतला..

सोबतच वाहतूक नियमाचे उल्लंघन होताच प्रणाली कशा प्रकारे तात्काळ प्रतिसाद देते याची प्रतक्ष चाचणी घेतली...

शहरातील 171 चौकात आयआयटीएमएस प्रणाली बसविण्यात येणार असुन त्यासाठी कंट्रोल सेंटरमध्ये अत्याधुनिक आणि सायबर सुरक्षित सर्व्हर प्रणाली उभारण्यात येणार आहे..

Pune ZP Election: पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागा साठी ५९७ उमेदवारी अर्ज दाखल

पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागा साठी ५९७ उमेदवारी अर्ज दाखल

चार वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विविध पक्षाच्या पदाधिक कार्यक्रम शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल

पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी ९०७ उमेदवाराने १६६ अर्ज दाखल केले आहेत

आज अर्जांची छाननी होणार आहे २७ जानेवारीला माघार घेण्याची मुदत आहे

पुणे जिल्हा परिषद निवडणूक ही गाजणार..

Yavatmal: दीड लाख घरकुलांना मिळणार 11 हजार ब्रास मोफत वाळू

प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यात एक लाख 60 हजार 374 घरकुलाचे बांधकाम सुरू आहे या घरकुलधारकांना पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे मात्र त्यानंतर बांधकाम करण्यासाठी लागणारा निधी अनेक घरकुल धारकांना मिळाला नव्हता यातच घरकुल साठी लागणारी वाळू उपलब्ध न झाल्याने अनेकांचे बांधकाम थांबले होते आता नवीन वाळू धोरणांमधून 11 हजार ब्रास वाळू राखीव ठेवण्यात आले आहे यामुळे घरकुलधारकांना मिळणाऱ्या मोफत वाळूचा प्रश्न निकाली निघाला आहे.

Maharashtra Live News Update : म्हाडा मुंबई मंडळाच्या ८४ अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावाला मुदतवाढ

म्हाडा मुंबई मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ८४ अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावासाठी ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्याची मुदत २ फेब्रुवारी २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. पात्र अर्जदारांसाठी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाइन बोली प्रक्रिया होणार असून ५ फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाईल. मुलुंड, कुर्ला, पवई, जोगेश्वरी, गोरेगाव, मालवणी व चारकोप येथील गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सुधारित दरानुसार गाळ्यांच्या किमतीत घट करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज व अटी उपलब्ध आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.