मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली असली, तरी मुंबई वगळता इतर क्षेत्रांत त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही.
उद्धव ठाकरेयांच्या पक्षाला १२ महापालिकांत खाते उघडता आले नाही, तर पाच महापालिकांमध्ये त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. २०१७च्या तुलनेत त्यांच्या जागांच्या संख्येत घट झाली. दोन्ही नेत्यांनी युतीची घोषणा केली असली तरी, प्रचाराचा मुख्य भर प्रामुख्याने मुंबईवर राहिला. २९ महापालिकांच्या एकूण २,८६९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने १,४४० जागा जिंकत ६४.५१ टक्क्यांच्या प्रभावी स्ट्राइक रेटसह पहिले स्थान मिळवले आहे.
Kalyan Dombivli News : शिंदेंनी फिरविला राजकीय पट; कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला मनसेची साथउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ४०४ जागा जिंकून २७ टक्क्यांच्या स्ट्राइक रेटसह दुसरे स्थान पटकावले. काँग्रेसने ३१८ जागा (११.०८ टक्के), तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) १६४ (५.७१ टक्के) जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला १५६ जागा मिळाल्या असून त्यांचा स्ट्राइक रेट १२.८ टक्के इतका राहिला आहे.
दुसरा मोठा पक्षउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्याच्या इतर भागांत चांगली कामगिरी करीत १,२००हून अधिक नगरसेवक आणि ५६ नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. भाजपपाठोपाठ शिंदे यांची शिवसेना राज्यातील दुसरा मोठा पक्ष म्हणून समोर आली आहे. एकूण २९ महापालिकांच्या २,८६९ जागांसाठी निवडणूक झाली.
युतीचा परिणाम मर्यादितबऱ्याच वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते; मात्र या युतीचा मतदानावर होणारा परिणाम सध्या तरी मर्यादित असल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांत स्थान निर्माण करण्यासाठी या युतीला अधिक प्रयत्न करावे लागतील, असे चित्र दिसत आहे.
Mumbai Viral Video: नवरा-बायको घरातलं भांडण रस्त्यावर घेऊन आले, त्याने चक्क कपडे काढून घातला राडा निकाल दृष्टिक्षेपातभाजप - जागा १,४४० स्ट्राइक रेट (टक्क्यांत)६४.५१
शिवसेना (शिंदे) - जागा ४०४ स्ट्राइक रेट (टक्क्यांत)२७
काँग्रेस - जागा ३१८ स्ट्राइक रेट (टक्क्यांत) ११.८
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - जागा १६४ स्ट्राइक रेट (टक्क्यांत) ५.७१
शिवसेना (ठाकरे) - जागा १५६ स्ट्राइक रेट (टक्क्यांत) १२.८