आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. या स्पर्धेला आता काही दिवस बाकी आहेत. अपवाद वगळता या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बहुतांश संघांची घोषणा करण्या आली आहे. भारतात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर श्रीलंका सहयजमान आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा 7 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. तर 8 मार्च रोजी अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. यंदाही 2024 प्रमाणे एकूण 20 संघांत वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. अशात मोठी अपडेट समोर आली आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेआधी टीमला मोठा झटका लागला आहे. दुखापतीमुळे स्टार खेळाडूला वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. तर 2025 मध्ये झालेल्या टी 20i आशिया कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा वर्ल्ड कपसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. टीम मॅनेजमेंटने या खेळाडूला आधी वर्ल्ड कप संघात स्थान दिलं नव्हतं. मात्र अखेर त्या खेळाडूला संधी मिळाली आहे. तो खेळाडू नक्की कोण आहे? हे जाणून घेऊयात.
ओमान क्रिकेट टीमला झटका लागला आहे. ओमानला दुखापतीमुळे टी 20i वर्ल्ड कप 2026 संघात बदल करावा लागला आहे. हसनैन अली शाह याला साईड स्ट्रेनमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. तर हसनैनच्या जागी आमिर कलीम याचा समावेश करण्यात आला आहे. आमिर कलीन टी 20i आशिया कप स्पर्धेसाठी ओमान टीममध्ये होता.
आमिर 44 वर्षांचा आहे. आमिरने टी 20i आशिया कप स्पर्धेत 2 अर्धशतकं झळकावली होती. आमिरने त्यातील 1 अर्धशतक टीम इंडिया विरुद्ध लगावलं होतं. त्यामुळे आमिरकडून ओमानला वर्ल्ड कप स्पर्धेतही अशाच कामगिरीची आशा असणार आहे.
दरम्यान ओमान टीमचा या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. ओमानसह या ग्रुपमध्ये श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, झिंबाब्वे आणि आयर्लंडचा समावेश आहे. ओमान या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 9 फेब्रुवारीला झिंबाब्वे विरुद्ध खेळणार आहे.
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ओमान क्रिकेट टीम : जतिंदर सिंह (कर्णधार), विनायक शुक्ला (उपकर्णधार), मोहम्मद नदीम, शकील अहमद, हम्माद मिर्जा, वसीम अली, करण सोनावले, फैसल शाह, नदीम खान, सुफियान महमूद, जय ओडेदरा, शफीक जान, आशीष ओडेदरा, जितेन रामानंदी आणि आमिर कलीम.