राजापूर तालुक्यात इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी
esakal January 23, 2026 10:45 AM

राजापुरात इच्छुक
उमेदवारांची भाऊगर्दी
राजापूर, ता. २२ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज इच्छुक उमेदवारांनी भाऊगर्दी केली होती. त्यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीसह शिवसेना-काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज दिवसभरात जिल्हा परिषदेच्या ६ गटांसाठी १२ तर, पंचायत समितीच्या १२ गणासाठी ३५ अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि पंचायत समितीच्या बारा गणांसाठी निवडणूक होत आहेत.
---

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.