ऊसतोड करून औषधाला पैसे जमवायचे... प्रभू शेळकेने सांगितला त्याचा असाध्य आजार; म्हणाला, 'लोक बाबांना हिणवतात...'
esakal January 24, 2026 07:45 AM

'बिग बॉस मराठी ६' सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. यावेळेस इन्फ्लुएन्सर, नृत्यांगना, राजकारणी देखील या सीझनमध्ये पाहायला मिळतायत. त्याच्यातच आलाय काळू डॉन म्हणजेच प्रभू शेळके. प्रभू एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याचं फॅन फॉलोविंगदेखील मोठं आहे. मात्र प्रभूला एक गंभीर आजार आहे. घरात येण्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत या आजारपणाबद्दल त्याने सांगितलेलं. आई-वडिलांना हिणवलं जाणं, त्यांच्या औषधांचा खर्च याबद्दल तो मोकळेपणाने बोललाय.

'बिग बॉस मराठी ६' च्या घरात जाण्यापूर्वी प्रभूने इट्स मज्जाला मुलाखत दिली होती. यात बोलताना तो म्हणाला, 'दर महिन्याला माझं रक्त बदललं जातं. गेल्या आठ वर्षापासून मला हा आजार आहे. या आजाराचं नाव आहे यॅलेसेमिया. या आजारात शरीरातील रक्तपेशी नष्ट होत असतात. त्यामुळे दर महिन्याला मला रक्त बदलावं लागतं. मी तेव्हा लहान होतो, पाच वर्ष-आठ वर्ष मला झटके आले. त्यानंतर ते झटके बंद झाले. आठ वर्षानंतर आई-वडिलांना कळलं की, माझ्यात रक्त कमी आहे. मी तीन-चार वर्षांचा असतानाच मला हा त्रास सुरू झालेला. दोन वर्षानंतर परत रक्त चढवावं लागलं. मग पप्पांनी असं, एक दोनदा केलं. त्यावेळी ऊसतोडीला जायचे बाबा. त्यातून ५० हजार वैगरे जमवायचे आणि ते पैसे जे काही यायचे, त्यांने माझा औषधांचा खर्च व्हायचा. माझे हात पाय सुजायचे.'

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)