नाशिकच्या आकाशात थरार
फायटर जेट्सचा गडगडाट, आकाशात उधळलेले रंग आणि रोमांचक कसरती… नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात भारतीय वायुसेनेच्या शौर्याचे आणि डोळ्याचे पारणे फेडणारा भव्य कार्यक्रम पार पडला.
सूर्यकिरण एरो शोचे आकर्षण
भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ ॲरोबॅटिक पथकातर्फे गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस खास एरो शोचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्यांदाच नाशिकमध्ये
नाशिकमध्ये पहिल्यांदाच हा भव्य हवाई कसरतींचा कार्यक्रम झाला असून, नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली.
गंगापूर धरण सज्ज
गंगापूर धरण परिसरात या हवाई कसरती झाल्या. प्रशासन आणि विविध यंत्रणांनी यासाठी पूर्ण तयारी केली होती.
मंत्र्यांची पाहणीजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष धरण परिसरात पाहणी करून वाहतूक, आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत सूचना दिल्या.
शाळकरी मुलांना प्राधान्य
या कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते.
हॉक विमानांची झलक
हॉक एमके-१२३ प्रकारच्या 9 लढाऊ विमानांद्वारे 13 प्रशिक्षित वैमानिकांनी थरारक कसरती सादर केल्या.
तिरंग्याचा अभिमान
प्रत्येकी 45 मिनिटांच्या शोमध्ये तिरंग्याच्या रंगांची उधळण करत आकाशात देशभक्तीचा अद्भुत अनुभव नाशिककरांना मिळाला आहे.
Next : इंदिरा गांधींना पाठिंबा, बाबरी मशिद पाडल्याचं समर्थन; बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय प्रवास नेमका कसा होता? येथे क्लिक करा