‘सरपंच-द पॉवर मॅन’च्या पोस्टरचे प्रकाशन
.......
पानगाव : अनिकेत फिल्म प्रोडक्शनच्या ‘सरपंच- द पॉवर मॅन’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टर व टिजरचा प्रकाशन समारंभ बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी (ता. २५) होणार असल्याची माहिती महादेव जाधवर यांनी दिली आहे. सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण बार्शी शहर आणि तालुक्यातील कोरेगाव, पानगाव परिसरात झाले आहे. चित्रपटाचे कथानक, संगीत, अभिनय, निसर्गरम्य ठिकाणे याबाबत चित्रपटात विशेष लक्ष दिल्याचे श्री जाधवर यांनी सांगितले. चित्रपटातील अभिनेते महादेव जाधवर अभिनेत्री कशिश पाटील, रीलस्टार प्रशांत ताकिक यांच्यासह मान्यवर या समारंभास उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन दिग्दर्शक महादेव जाधवर आणि प्रशांत जाधवर यांनी केले आहे.