पिसे येथील तांत्रिक कामामुळे २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान शहर व पूर्व उपनगरांत १० टक्के पाणीकपात
मुंबई, ता. २३ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’च्या वार्षिक परिरक्षणाचे काम २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शहर विभाग तसेच पूर्व उपनगरांतील बहुतेक प्रशासकीय विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार असून, या कालावधीत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.
ठाणे व भिवंडी महापालिकेच्या हद्दीतील ज्या भागांना मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो, त्या भागांमध्येही १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. नागरिकांनी या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे तसेच महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभावित विभाग
शहर विभाग :
१. ‘ए’ विभाग - नेव्हल डॉकयार्ड परिसर
२. ‘बी’ विभाग - संपूर्ण विभाग
३. ‘सी’ विभाग - भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला परिसर
४. ‘ई’ विभाग - संपूर्ण विभाग
५. ‘एफ दक्षिण’ विभाग - संपूर्ण विभाग
६. ‘एफ उत्तर’ विभाग - संपूर्ण विभाग
पूर्व उपनगरे :
१. ‘टी’ विभाग - मुलुंड (पूर्व व पश्चिम)
२. ‘एस’ विभाग - भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग व विक्रोळी (पूर्व)
३. ‘एन’ विभाग - विक्रोळी, घाटकोपर (पूर्व)
४. ‘एल’ विभाग - कुर्ला (पूर्व)
५. ‘एम पूर्व’ विभाग - संपूर्ण विभाग
६. ‘एम पश्चिम’ विभाग - संपूर्ण विभाग