Vastu Tips : करोडपती लोकांच्या घरात असतात या 3 मूर्ती, माता लक्ष्मी करते पैशांचा वर्षाव
Tv9 Marathi January 25, 2026 12:45 PM

वास्तुशास्त्रात घराच्या कोणत्या कोपऱ्यात काय ठेवावे याची माहिती देण्यात आलेली आहे. कारण घरातील प्रत्येक घटक कुटुंबाच्या प्रगतीवर, शांती आणि आनंदावर परिणाम करतो. त्यामुळे वास्तुनुसार तुमचे घर सजवणे शुभ मानले जाते. जर एखाद्याच्या घरात चुकीची वस्तू असेल किंवा ती चुकीच्या जागेवर असेल तर त्या घरातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घरातील लोकांनी आर्थिक चणचण, शांततेचा अभाव, आजारपण अशा प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. वास्तू शास्त्र जसे वाईट घटकांसाठी कारणीभूत ठरते तसे ते चांगल्या गोष्टींसाठीही फायदेशीर ठरू शकते. वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घरातील वस्तू तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात.

तुम्ही अनेक करोडपती लोक पाहिले असतील ज्यांची दैवी शक्तींवर श्रद्धा असते. कारण करोडपतींच्या घरात काही वस्तू असतात ज्यामुळे संपत्ती येते. वास्तुशास्त्रानुसार घरात काही मूर्ती आवश्यक असतात. त्या समृद्धीशी संबंधित आहेत. या मुर्तींमुळे तुमच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होऊ शकते. करोडपती लोकांच्या घरात कोणत्या मूर्ती असतात आणि त्याचे फायदे काय आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

करोडपतींच्या घरात या मूर्ती आढळतात

गायीची मूर्ती – वास्तुशास्त्रानुसार, घरात कामधेनू गायीची मूर्ती ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. संपत्ती आणि समृद्धी सतत वाढते. कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही. करोडपतींच्या घरात तुम्ही ही मूर्ती पाहिली असेल. ही मूर्ती प्रार्थना कक्ष, बैठक खोली किंवा अभ्यासाच्या खोलीत ठेवता येते. यामुळे वातावरण नेहमी सकारात्मक राहते.

कासव – कासव हा भगवान विष्णूचा कूर्म अवतार आहे. वास्तुशास्त्रानुसार, कासव जिथे असतो तिथे देवी लक्ष्मी वास करते. त्यामुळे घरात कासवाची मूर्ती ठेवणे चांगले मानले जाते. ड्रॉइंग रूममध्ये धातूचा कासव ठेवल्याने संपत्तीचे स्रोत मजबूत होतात. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने सतत पैसे येत राहतात.

हत्तीची मूर्ती – घरात चांदीचा हत्ती ठेवणे वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार खूप शुभ असते. या मूर्तीमुळे आनंद, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीत वाढ होते. कारण हत्तीची मूर्ती भगवान गणेशाशी संबंधित आहे. यामुळे त्रास दूर होतो आणि सकारात्मक परिणाम जाणवतात.

या गोष्टी करू नका
  • एकाच देवतेच्या दोन मूर्ती किंवा एक दुसऱ्याच्या विरुद्ध मूर्ती ठेवू नका.
  • तुटलेली किंवा खराब झालेली मूर्ती घरात ठेवू नका.
  • बेडरूम किंवा शौचालयाजवळ मंदिर बांधू नका.
  • शनिदेवाची मूर्ती किंवा दुर्गेची क्रोधित रूपातील मूर्ती घरात ठेवू नका.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.