सोमाटणे, ता. २४ ः चांदखेड येथे ‘कृषी कन्या’ मार्फत आयोजित शेती प्रशिक्षण, मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेती करण्याकडे कल वाढला आहे.
मागील एक महिन्यापासून डॉ. डी. वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या सात कृषी कंन्याच्या वतीने शेती मार्गदर्शन प्रशिक्षण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून आधुनिक शेती तंत्राने सेंद्रिय शेती करण्यास सुरवात केली आहे. कृषी कंन्याच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले जाते. यात माती परिक्षणाचे तंत्र, त्याचा उपयोग, शेतीच्या मशागत पद्धती, सेंद्रिय खताचे महत्त्व व त्याचा वापर, बियाणांची निवड व बियाणे निर्जंतुक करणे,
पेरणी पद्धत, कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर, कीड नियंत्रणाचे तंत्र, ‘महाविस्तार अॅप’चे महत्त्व, पाणी व्यवस्थापन,
धान्य साठवण, जनावरांचे संगोपन व दुग्ध वाढीचे तंत्र, कुक्कुटपालनाच्या आधुनिक पद्धती व रोग नियंत्रण आदी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. अशी माहिती शेतकरी नितीन गायकवाड यांनी दिली.
PNE26V89270