Sanjay Raut on Eknath Shinde Shivsena : पुढच्या निवडणुकीत शिंदेंकडे धनुष्यबाण चिन्ह नसेल; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Marathi January 25, 2026 06:26 PM

Sanjay Raut on मराठी Shivsena: पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे (मराठी) यांच्याकडे शिवसेना पक्ष (Shivsena party) राहणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. येत्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) निकालानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल. याची भीती असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असून शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणीबाबत वारंवार तारखा दिल्या आहेत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते शुक्रवारी ‘एबीपी’च्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत खळबळजनक दावे केले.

पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह नसेल. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल. शिंदे यांच्याकडे त्यांचा पक्ष राहणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांना वाकून पुष्पगुच्छ दिला आहे तरी त्याचा फायदा होणार नाही. भारतीय संविधानातील 10व्या परिशिष्टानुसार धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाील. एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांनी चालवायला दिलेल्या कंपनीचे शटर  डाऊन होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.