नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला 100 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी कॅनडावर 100 टक्के टॅरिफ लादल्यास कॅनडातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ वसूल केलं जाईल. ट्रम्प यांनी जर कॅनडानं चीन सोबत व्यापारी करार केला तर 100 टक्के टॅरिफ लादू असा इशारावजा धमकी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलावर हल्ला करत तिथल्या राष्ट्रपतींना अटक केली. त्यानंतर इराणला इशारा दिला आता ट्रम्प यांच्या निशाण्यावर कॅनडा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात ट्रथ सोशलवर एक पोस्ट केली होती. त्यात अमेरिकेत पोहोचणाऱ्या चिनी वस्तूंसाठी कॅनडा माध्यम बनणार असेल तर त्यांच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडलेले असताना ट्रम्प यांनी टॅरिफची धमकी दिली आहे. कॅनडानं ट्रम्प यांच्या प्रस्तावित गोल्डन डोम मिसाइल संरक्षण योजनेला नकार दिला आहे. त्यामुळं संबंध बिघडले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की जर गवर्नर कार्नी यांना वाटतं असेल की चीनसाठी वस्तू खरेदी करुन उत्पादनं अमेरिकेला पाठवण्याचं केंद्र बनणार असतील तर भ्रमात राहत आहे. जर कॅनडानं चीनसोबत कोणताही व्यापारी करार केला तर अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या सर्व कॅनडाच्या वस्तूंवर आणि उत्पादनांवर 100 टक्के टॅरिफ लादलं जाईल. ट्रम्प पुढं म्हणाले चीन कॅनडाला जिवंत गिळून टाकेल.
डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँडवर गोल्ड डोम तयार करायचा आहे. कॅनडाचा त्या देशाला विरोध आहे. ट्रम्प म्हणतात गोल्ड डोम कॅनडाचं देखील संरक्षण करेल. कॅनडानं चीनसोबत व्यापार करण्याच्या बाजूनं मतदान केलं आहे. कॅनडा दीर्घकाळापासून अमेरिकेचा व्यापारी भागीदार राहिलेला आहे. तज्ज्ञांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर 100 टक्के टॅरिफ लादल्यास दोन्ही देशांवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. अगोदरच रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500 टक्के टॅरिफची धमकी ट्रम्प यांच्या प्रशासनानं दिली आहे. चीन व्हेनेझुएलाकडून क्रूड ऑईल मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो. तिथं ट्रम्प यांनी ताबा मिळवला आहे. याशिवाय इराण देखील मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईल चीनला विक्री करते. ट्रम्प यांनी इराणवर देखील कारवाई करण्याची धमकी दिलेली आहे. आता कॅनडाला ट्रम्प यांनी दिलेल्या 100 टक्के टॅरिफच्या धमकीमागं कॅनडाचं चीन कनेक्शन असल्याचं दिसून येतं.