IND vs NZ : टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला आनंदाची बातमी, प्लेइंग 11 मध्ये बदल; पण…
GH News January 25, 2026 10:11 PM

न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दव फॅक्टर पाहता दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणं सोपं जातं. कर्णधार सूर्यकुमार यादवने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आम्ही आज पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोतत. विकेट चांगली दिसत आहे. नंतर दव पडलं तर त्याचा फायदा घेता येईल. निर्भय राहा, स्वत: निर्णय घ्या आनंद घ्या आणि तितकंच नम्र राहा. आजच्या सामन्यासाठी संघात दोन बदल करण्यात आले आहेत. अर्शदीप सिंग आणि वरूण चक्रवर्ती यांना आराम दिला गेला आहे. तर जसप्रीत बुमराह आणि रवि बिश्नोई यंना संधी दिली आहे.’

या सामन्यात खरं तर तिलक वर्माची एन्ट्री अपेक्षित होती. पण त्याला संधी मिळाली नाही. कारण विजय हजारे ट्रॉफीत त्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता फिट अँड फाईन असून तिसऱ्या टी20 सामन्यापासून टीम इंडियासोबत आहे. मात्र त्याला संधी मिळाली नाही. चौथ्या टी20 सामन्यात त्याचा विचार केला जाऊ शकतो. सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्यावर विश्वास ठेवला आहे. संजू सॅमसन पहिल्या दोन सामन्यात हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर या सामन्यात दडपण असणार आहे. दुसरीकडे, इशान किशनची बॅट चांगलीच तळपली होती. त्यामुळे त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, संघात दोन बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह आणि रवि बिश्नोई यांना संघात स्थान मिळालं आहे. जसप्रीत बुमराहला मागच्या सामन्यात आराम दिल्याने वादाला फोडणी मिळाली होती. तर वरूण चक्रवर्तीची जागा रवि बिश्नोईने घेतली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याची लिटमस टेस्ट असणार आहे. यात पास झाला तर कदाचित त्याचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या प्लेइंग 11 मध्ये विचार केला जाईल.

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.