भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी पूर्णपणे स्वतंत्र झाला असून ९९ वर्षांच्या लीज किंवा करारावर स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. '९९ वर्षांच्या लीज'चा हा प्रकार केवळ सोशल मीडियावरील अफवा असून त्याला कोणताही ऐतिहासिक किंवा कायदेशीर आधार नाही. ब्रिटीश संसदेने संमत केलेल्या 'भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७' (Indian Independence Act 1947) नुसार भारताला संपूर्ण सार्वभौमत्व बहाल करण्यात आले होते, ज्यामध्ये कोणत्याही कराराचा किंवा परत येण्याच्या अटीचा उल्लेख नाही.
BJYM (भारतीय जनता युवा मोर्चा) ची नेत्या असल्याचे सांगणाऱ्या रुची पाठक (Ruchi Pathak) यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्या दावा करताना दिसतात की, "भारत ९९ वर्षांच्या लीजवर स्वतंत्र झाला असून २०४६ मध्ये हा करार संपल्यावर इंग्रज पुन्हा भारतात येतील." मात्र, हा दावा पूर्णतः चुकीचा असल्याचे सिद्ध झाले असून स्वतः इतिहासकार आणि घटनातज्ज्ञांनी अशा प्रकारच्या कोणत्याही कराराचे अस्तित्व नाकारले आहे.
View this post on InstagramA post shared by POLITICS LIVE (@politics_lives)
या संदर्भात भारतीय राज्यघटनेचा आणि अधिकृत कागदपत्रांचा अभ्यास केल्यास स्पष्ट होते की भारताचे स्वातंत्र्य हे पूर्ण स्वराज्य आहे. भारताचा आपला स्वतःचा ध्वज, संविधान आणि लष्कर आहे. जर देश करारावर असता तर भारत कॉमनवेल्थ देशांच्या गटात सामील होताना किंवा संयुक्त राष्ट्रांचा सदस्य होताना त्यावर ब्रिटीशांचे नियंत्रण राहिले असते जे की वास्तवत नाही. १५ ऑगस्ट १९४७ ला ब्रिटीशांनी भारताचे सर्व अधिकार पूर्णपणे सोडून दिले होते.
Maratha History : छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊ कोण होत्या? आता कुठे आहेत त्यांचे वंशज अन् कशी आहे परिस्थितीरुची पाठक यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती आणि त्यांचे हे विधान केवळ अज्ञानातून केलेले असल्याचे म्हटले गेले. त्यामुळे २०४६ मध्ये इंग्रज परत येणार किंवा भारताचे स्वातंत्र्य संपणार यांसारख्या वावड्यांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहून अधिकृत सरकारी सोर्सवर आणि भारत सरकारच्या अधिकृत पोर्टलवर विश्वास ठेवावा.