तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय
‘सोंगाड्या’ नावाने खेडकर यांची देशभर ओळख निर्माण केली
लोककलेसाठी आयुष्यभर दिलेल्या योगदानामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला
केंद्र सरकारकडून प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकूण ४५ नावे जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रात संगमनेरचं नाव गाजवणारे ज्येष्ठ तमाशा कलवंत रुघुवीर खेडकर यांना देशातील सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीये. तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांच्या नावाचाही समावेश झाल्याने तमाशा कलावंतामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. रघुवीर यांच्यासहित अर्मिंडा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार झालाय. परभणीच्या श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार झाहीर करण्यात आलाय. पालघरच्या वाराली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पुरस्कार जाहीर झालाय.
कोण आहेत रघुवीर खेडकर?तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचा अमूल्य वारसा रघुवीर खेडकर यांनी तमाशाच्या माध्यमातून आयुष्यभर प्रामाणिकपणे पुढे केलं. रघुवीर खेडेकर यांनी लोककलेला गतवैभव प्राप्त करून दिलं. त्यांनी महाराष्ट्र राज्य तमाशा महामंडळाचे अध्यक्षपदही भूषवलं.
अकोल्यात भाजपने डाव टाकला; शरद पवारांचा पक्ष फोडला, सत्ता समीकरणासाठी बहुमताचा आकडा गाठलात्यांनी तरुणपणात बोर्डावर केलेलं थाळीनृत्य अप्रतिम असायचं. त्यांचं नृत्य कथ्थक आणि लोककलेचं मिश्रण आहे. खेडकर यांनी आई कांताबाई सातारकर यांनी तमाशा मंडळाची धुरा यशस्वीपणे सांभाळला. सोंगाड्या म्हणूनही लौकीक आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी दिल्लीत बहुमान मिळाला होता.
shocking : सरपंच सासू अन् मुख्याध्यापक सासऱ्याचा जाच असह्य झाला; पुण्याच्या दीप्तीने मृत्यूला कवटाळलं सत्यनारायण नुवाल यांना पद्मश्री पुरस्कारनागपूर स्थित सोलार इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अवघ्या २ हजार रुपयांपासून सुरू केलेल्या उद्योगाला जागतिक ओळख मिळवून दिली. सोलार इंडस्ट्रीज ही जगातील चौथी सर्वात मोठी स्फोटक उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे. कंपनीचा मार्केट कॅप १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकभारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेत मोलाचे योगदान आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कर आणि वायुसेनेला दारूगोळा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. उद्योजकतेसोबतच राष्ट्रीय सुरक्षेत योगदानासाठी सन्मान करण्यात आलं आहे.