Axita Cotton Ltd या कंपनीने पुन्हा एकदा बोनस शेअर देण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनी पाचव्या वेळा बोनस शेअर देत आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक्सिटा कॉटन शेअरची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे.
स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी 10 शेअरवर 1 शेअर बोनस देणार आहे. बोनस इश्यूसाठी कंपनीने 13 फेब्रुवारी 2026 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे या दिवसांपर्यंत 10 शेअर असतील. त्यांना कंपनी एक शेअर मोफत देईल.
यापूर्वी कंपनीने चार वेळ बोनस शेअर दिला आहे. कंपनीने 2019 मध्ये बोनस शेअर दिला, पहिल्यावेळी कंपनीने एका शेअरवर एक शेअर बोनस दिला. दुसर्यांदा कंपनीने 2022 मध्ये बोनस शेअर दिला. तेव्हा गुंतवणूकदारांना 2 शेअरवर 1 शेअर बोनस देण्यात आला. 2023 आणि 2024 मध्ये कंपनीने प्रत्येकी 3 शेअरवर 1 बोनस शेअर दिला.
शेअर बाजारात बोनस शेअरची बातमी धडकल्यानंतर शुक्रवारी बाजार बंद होताना बीएसईवर हा स्टॉक 3.15 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 9.50 रुपयांवर बंद झाला. गेल्या तीन महिन्यात या पेनी स्टॉकमध्ये किंमतीत 12 टक्क्यांची तेजी दिसून आली. एका वर्षात हा शेअर 12 टक्क्यांनी घसरला. तीन वर्षात हा शेअर 69 टक्क्यांनी आपटला.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.