कर्नल सोफिया कुरेशी यांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनी विशेष सेवा पदक प्रदान करण्यात येणार आहे.
J & K Live : जम्मू आणि काश्मीरमधील राजौरीतील सुंदरबनी येथे गंजलेली एके-४७ रायफल सापडलीजम्मू आणि काश्मीरमधील राजौरीतील सुंदरबनी परिसरातील एका जलाशयातून गंजलेली एके-४७ रायफल सापडली आहे. पथके अधिक माहिती गोळा करत आहेत. सध्या दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. हे कदाचित नदीकाठी वाहून आलेले जुने शस्त्र असावे.
Republic Day Live : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मुझफ्फरपूरमध्ये राष्ट्रध्वज फडकवणारराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत प्रजासत्ताक दिनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे राष्ट्रध्वज फडकवणार आहेत.
Madhya Pradesh Live : मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे मोठा अपघात: मातीची खाण कोसळून तीन कामगारांचा मृत्यू, दोन जखमीमध्य प्रदेशातील सिंगरौली येथे मातीची खाण कोसळून तीन कामगारांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी. खाणीतून माती काढत असताना हा अपघात झाला.
President Droupadi Murmu Live : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधनप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला संबोधित केले. त्या म्हणाल्या की प्रजासत्ताक दिन भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ यांना जोडतो. संविधानाच्या आदर्शांनी भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही बनवले आहे. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात लोकशाही आणि सांस्कृतिक एकतेवर भर दिला
Tej Pratap Yadav: राहुल गांधी भ्याड नेते आहेत - तेज प्रताप यादवराहुल गांधी भ्याड नेते आहेत”: शकील अहमद यांच्या वक्तव्यावर तेज प्रताप यादव
Veteran journalist Mark Tully passed away: ज्येष्ठ पत्रकार मार्क टली यांचे ९० व्या वर्षी निधनज्येष्ठ पत्रकार मार्क टली यांचे ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांना गेल्या एका आठवड्यापासून साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज दुपारी त्यांचे निधन झाले.
Mumbai News: शूटिंगच्या नावाखाली तरुणीची फसवणूकसोशल मीडियावर कलाकार म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची शूटिंग व पॉडकास्टच्या नावाखाली फसवणूक करून तिच्या संमतीशिवाय अश्लील व्हिडीओ चित्रीकरण करून ते इंटरनेटवर प्रसारित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीने कांदिवलीतील सोनिया गुप्ता नावाच्या महिलेचा 7 सहकाऱ्यांविरोधात समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Jalgaon News: पठाणकोट एक्सप्रेसला दहा दिवसात थांबा द्या, अन्यथा रेलरोको आंदोलन करणाररावेर तालुक्यातील निंभोरा येथे पठाणकोट एक्सप्रेसला पूर्ववत थांबा मिळावा या मागणीकरीता निंभोरा व परिसर गाव सेवा समितीने अत्यंत छुप्या पद्धतीने व गनिमी काव्याने तारीख न सांगता अचानक रेल रोको व जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीचे प्रमुख संयोजक विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
Mumbai News: “बिहार भवन महाराष्ट्रात बांधू देणार नाही; उभारल्यास तोडून टाकू” – भीम आर्मी महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे यांची घोषणाबिहार राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी संपूर्ण देशातून बिहार सरकारकडे निवेदने सादर करण्यात आली आहेत. या आंदोलनादरम्यान बौद्ध धम्मगुरूंवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला, त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध देशभरातील बौद्ध राष्ट्रांनी आणि बौद्ध अनुयायांनी केला आहे.
Pune Live: झपुण्यात हिट अँड रन! सायकल स्पर्धेसाठी काढलेले गतिरोधक पुन्हा बसवा नगरसेवकाची महापालिकेला मागणीपुण्यात आयोजित केलेली ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेसाठी रस्त्यातील गतिरोधक काढून टाकण्यात आले होते. ही स्पर्धा संपल्यानंतर आता हे गतिरोधक पुन्हा बसवावे आणि अपघातांचा धोका कमी करावा अशी मागणी माजी सभागृहनेते, नगरसेवक नीलेश निकम यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
Live : दावोसहून नंदुरबारसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक, जिल्ह्याच्या विकासाला नवी गतीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथून नंदुरबार जिल्ह्यासाठी तब्बल ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. जिल्ह्यात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मजुरांचे स्थलांतर होत असताना, ही गुंतवणूक नंदुरबार जिल्ह्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे. गुंतवणुकीमुळे सातपुडा भागातील दुर्गम परिसरात रोजगारनिर्मिती होऊन विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
Live: शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरलशिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
चुकीचे तिकीट वाटप केल्याचा राग धरत शिवसैनिकाचा घेराव घातल्याचा व्हिडिओ व्हायरल
शिवसेनेचे एबी फॉर्म राजन साळवी यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व मल्हार पाटील यांना देत वाटप केल्याच्या मुद्द्यावरन शिवसेनेचा कार्यकर्ता व राजन साळवी यांच्यातील वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर दुसरा व्हिडिओ वायरल
Chandrapur Live : चंद्रपुरातील शिवसेना नगरसेवकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेटचंद्रपुरातील शिवसेना नगरसेवकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
चंद्रपुरातील ठाकरे सेना आणि वंचित युतीच्या आठ नगरसेवकांसह दोन अपक्षांनी काही वेळापूर्वी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी संजय राऊत यांच्यासोबतच एकूण दहा नगरसेवक उपस्थित होते.
Kalyan Live : कल्याणमध्ये वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण, घटनेचा व्हिडीओ व्हायरलकल्याणच्या दुर्गाडी चौकात वाहतूक पोलिस कर्मचारी विलास भागीत यांना रॉंग साईडने गाडी का चालवली याचा जाब विचारल्याने चार तरुणांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर विलास भागीत यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके पाठवली आहेत. मारहाण करणारे तरुण शिवसेना शिंदे गटाच्या एका नगरसेवकाचे समर्थक असल्याची माहिती मिळाली आहे.
Kolhapur Live : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवलेकोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवले. पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांनी पंचगंगा नदीत पोहत जाऊन महिलेला वाचवले. शहाणा रफिक शेख (वय- 38) असे बुडणाऱ्या महिलेचे नाव आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांना डायल ११२ वर इमर्जन्सी कॉल मिळताच चार्ली १ च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बुडणाऱ्या महिलेला जीवनदान दिले.
Paral Live : परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीत एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेतपरिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो भेटीदरम्यान एसटीचे चालक आणि वाहक मद्यधुंद अवस्थेत आढळले. संबंधित चालक आणि वाहकांवर तात्काळ कारवाई करण्याचे प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले. प्रताप सरनाईक यांनी सर्व चालक आणि वाहकांची ब्रेथ अनालायझरने तपासणी करण्याचेही आदेश दिले. प्रताप सरनाईक यांना चालक आणि वाहकांच्या विश्रांतीगृहात दारूच्या बाटल्या आढळल्या.
Liveupdate: "भारतातील मुस्लिम पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहेत"- एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमलएआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल म्हणतात, "भारतातील मुस्लिम पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. मुस्लिमांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. या देशातील आमचे सर्व हिंदू बांधव मुस्लिमांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांना (मुख्यमंत्री सर्मा) "मियाँ मियाँ" म्हणत राहू द्या. आमच्या मते, एकाही मुस्लिमाने भाजपला एकही मत देऊ नये. जर त्यांनी असे केले तर ते आपल्या समुदायाचे, आपल्या जातीचे दुर्दैव आहे... काँग्रेस भाजपला १००% वॉकओव्हर देत आहे. एक समजूतदारपणा आहे आणि मी हे उघडपणे सांगत आहे. त्यांना भाजपला परत आणायचे आहे..."
Live Update: परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीत एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेतपरिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो भेटीत एसटीचे चालक आणि वाहक मद्यधुंद अवस्थेत आढळले. संबंधित चालक आणि वाहकांवर तात्काळ कारवाई करण्याचे प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले. प्रताप सरनाईक यांनी सर्व चालक आणि वाहकांची ब्रेथ अनालायझरने तपासणी करण्याचेही आदेश दिले. प्रताप सरनाईक यांना चालक आणि वाहकांच्या विश्रांतीगृहात दारूच्या बाटल्या आढळल्या.
Kolhapur : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवलेकोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवले
पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांनी पंचगंगा नदीत पोहत जात महिलेला वाचवले
शहाणा रफिक शेख (वय- 38) अस बुडणाऱ्या महिलेच नाव
लक्ष्मीपुरी पोलिसांना डायल ११२ वर इमर्जन्सी कॉल प्राप्त होताच चार्ली १ च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बुडणाऱ्या महिलेला दिले जीवनदान
पुणे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे भाकरी फिरवणारपुणे महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव, राज ठाकरे भाकरी फिरवणार
पराभवानंतर मनसे करणार आत्मचिंतन
राज ठाकरे पुण्यात भाकरी फिरवणार
पुणे शहरात पक्षांतर्गत मोठे बदल होणार
Live update"२७ जानेवारी हा आपल्या राज्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस ..." मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीयुसीसीच्या १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणतात, "२७ जानेवारी हा आपल्या राज्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर, संविधान निर्मात्यांनी कलम ४४ मध्ये देशात समान नागरी संहिता असावी अशी तरतूद समाविष्ट केली होती. उत्तराखंडच्या लोकांनी त्याची अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेतला आहे. ते यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण करत आहे..."
सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दीसलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
शनिवार , रविवार व प्रजासत्ताक दिनाच्या सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
पर्यटन स्थळांपेक्षा धार्मिक स्थळांना भाविकांची जास्त पसंती
साईसमाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
देशभरातून साईभक्त शिर्डीत साईदर्शनासाठी दाखल
तुळजापुरात सलग सुट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दीतुळजापुरात सलग सुट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
तुळजापुरात सलग सुट्ट्यांच्या पाश्र्वभूमीवर भाविकांच्या गर्दीत वाढ झाली आहे.शनिवार,रविवार व 26 जानेवारी या सलग सुट्ट्या लागुन आल्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. तुळजापुर हे साडेतीन शक्ती पिठापैकी एक पुर्ण पिठ आहे.देवीचा कुलधर्म कुलाचार करण्यासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने तुळजापूरात येत असतात.तुळजापुरात झालेल्या गर्दीमुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलुन गेली आहे.
Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दीNashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
मंदिरापासून त्र्यंबकेश्वर गावात 4 ते 5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा
एका भाविकाला दर्शनासाठी लागतोय तब्बल 8 ते 9 तासांचा वेळ
26 जानेवारी आणि सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी
Nashik live : नाशिकमध्ये यांत्रिक मशीन द्वारे कांदा लागवडकांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात बहुतांश शेतकरी नगदी पीक म्हणून कांदा लागवड करीत असतात,सध्या अनेक भागात उन्हाळी कांद्याची लागवड सुरू झाली आहे.
Pune Live : पुण्यात नगरसेविकेच्याच भावावर हल्लापुण्यात नगरसेविकेच्याच भावावर हल्ला
बॅनर लावण्यावरून झाला होता वाद त्यावरून केली मारहाण
टोळक्याने हल्ला करून बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे
१४ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Solapur live : सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दीसलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. सुमारे दोन लाख भाविक पंढरपुरात आले आहेत. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्रशेड पर्यंत गेली आहे. दर्शनासाठी पाच तासांचा अवधी लागत आहे. शनिवार, रविवार आणि उद्या भारतीय प्रजासत्ताक दिनाची सलग सुट्टी आल्याने पंढरपुरात गर्दी वाढली आहे. पंढरपुरातील सर्व मठ धर्मशाळा भाविकांनी भरून गेली आहेत. दरम्यान मंदीर परिसरात फेरीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थटाल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.
Pune News : पुण्यात ६७ हजार दुबार मतदार नोंदणीजिल्हा परिषद पंचायत समिती साठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत 67 हजार दुबार नावे दुबार मतदान रोखण्यासाठी प्रशासन सतर्क जिल्हा प्रशासन दुबार मतदारांकडून घेणार हमीपत्र मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचे हमीपत्र राज्य निवडणूक आयोगात करून लिहून घेतले जाणार आहे.
Raigad News : सलग सुट्ट्यांमुळे रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दीप्रजासत्ताक दिन आणि शनिवार-रविवार जोडून सुट्ट्या आल्यानं मोठ्या प्रमाणावर पर्यटक बाहेर पडले आहेत. रायगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळं गर्दीने फुलून गेली आहेत.
Malad News : मालाडमध्ये प्राध्यापक हत्या प्रकरणी आरोपीला अटकमालाड रेल्वे स्थानकात किरकोळ वादातून प्राध्यापकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने शोध मोहिम राबवत आरोपीला अटक केलीय. १२ तासांच्या आत बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अलोक सिंग असं हत्या झालेल्या प्राध्यापकाचं नाव आहे.
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची बैठक होणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मुंबईत बैठक होणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपाच्या समीकरणांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये महापौर कोणाचा, स्थायी समिती आणि इतर पदांच्या वाटपावर या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होऊ शकतं.