Horoscope Prediction : आज 27 जानेवारीला बनतोय सुनफा राजयोग ; 'या' राशींना होणार भरभरून धनलाभ
esakal January 27, 2026 06:47 PM

Marathi Rashi Bhavishya Update : आज 27 जानेवारीला मंगळवारी वृषभ राशीमध्ये चंद्रापासून दुसऱ्या भावात गुरु आणि मिथुन राशीत गुरु असल्यामुळे सुनफा योग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग अतिशय शुभ असून हा योग धनलाभ देतो. अनेक राशींना या योगाचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया आजचं आर्थिक राशिभविष्य.

मेष रास :

आज तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या भावना ओळखून त्यानुसार काम करा. यातूनच तुम्हाला समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी टीमवर्कने काम केलं तर कोणत्याही समस्येतून सुटका मिळेल.

वृषभ रास :

आज शुक्र आठव्या भावात आहे. तर चौथ्या घरात केतू असून पराक्रमाच्या घरावर तो शुभ दृष्टीने पाहतोय. त्यामुळे आज तुम्ही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यात वेळ घालवाल. घरातील मोठ्यांशी वाद घालणे टाळा. त्यांचा सल्ला ऐका.

मिथुन रास :

अकराव्या भावात चंद्र आणि राशीच्या पहिल्या घरात असलेले गुरु तुम्हाला सम्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देतील. व्यवसायातील पार्टनर याबरोबर खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचीही साथ मिळेल. लोन कमी होईल.

कर्क रास :

तुमच्या राशीच्या बाराव्या भागात गुरु तसेच मेष राशीच्या दहाव्या भावात चंद्र असल्यामुळे उत्तम धनलाभ आणि अडकलेलं धन परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन संबंध बनतील. राजनैतिक आणि सामाजिक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. रात्री एखाद्या मंगलमय कार्यात सहभागी व्हाल.

सिंह रास :

आज चंद्र तुमच्या नवव्या घरात आहे आणि शनी आठव्या घरात आहे. यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. सर्जनशील कामात तुमची आवड वाढेल. तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न ठरेल.

कन्या रास :

तुमच्या कुंडलीच्या आठव्या घरात चंद्र भ्रमण करतोय. तर सातव्या घरात शनी असल्यामुळे मित्रांबरोबरचे अनावश्यक वाद टाळा. तुमच्या सभोवताली आनंददायी वातावरण कसं निर्माण होईल याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अचानक बदल पाहायला मिळेल. महिला सहकाऱ्यांचा पाठींबा मिळेल.

तूळ रास :

आजच्या दिवशी मोठ्या लोकांशी भेटीगाठी होतील. अनपेक्षित घटनांचा लाभ होईल. नवीन योजनांचा कायदेशीर अभ्यास करून काळजीपूर्वक निर्णय घ्या. अडकलेली घरगुती कामं पूर्ण होतील.

वृश्चिक रास :

आज तुमचा दिवस आनंदात जाईल. एखादा सल्ला तुम्हाला घ्यावा लागेल. तुमच्या मैत्रिणींशी तुमची भेट होईल. सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाडाल.

धनु रास :

आजचा दिवस संमिश्र आहे. जुन्या जबाबदाऱ्यांमधून मुक्ती मिळेल. तुमच्या सूचनांचं स्वागत होईल. काही आवश्यक घरगुती वस्तूंची खरेदी कराल. खर्च जपून करा. कुटूंबासोबत वेळ घालवाल.

मकर रास :

आज एखादा दूरच प्रवास संभवतो. एखाद्या लग्नकार्याला उपस्थित राहाल. एखाद्या जुन्या नातेवाईकाची भेट होईल. कुणी कर्ज मागितले तर देऊ नका.

कुंभ रास :

सक्रिय राजकारणात सहभागी व्हाल. तुमचे प्रतिस्पर्धी स्पर्धेत मागे पडतील. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम जाईल. खर्चामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. धर्मादाय कार्यांवर खर्च कराल.

मीन रास :

आज तुमची संपत्ती वाढेल. माहेरच्या कुटूंबाकडून मान मिळेल. कुटूंबाचा सन्मान मिळेल. तुमचे गुप्त शत्रू एखादं कारस्थान रचू शकतात ज्याचा तुम्हाला त्रास होईल. तुमच्या गुरूंचा आदर करा.

Horoscope : 26 जानेवारीनंतर धनयोग सुरू! 'या' 4 राशीच्या लोकांची लॉटरी; अचानक येतील पैसे अन् प्रेमात यश, ऐकायला मिळेल मोठी खुशखबर
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.