बारामतीतून मोठी बातमी! बाबासाहेबांचा फोटो डावलला, वंचितची नगराध्यक्षांवर शाईफेक
Tv9 Marathi January 28, 2026 01:46 AM

बारामतीतून मोठी बातमी समोर आली आहे. बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक झाल्याचे समोर आले आहे. सुपा येथा सचिन सातव यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वंचिच बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बारामतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रजासत्ताक दिनी नगर पालिकेतील एका कार्यक्रमात झालेल्या चुकीमुळे ही वंचितच्या कार्यकर्तांकडून ही शाईफेक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक

संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आहे. या खास दिना निमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बारामती नगर परिषदेतही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काल प्रजासत्ताक दिनी नगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्यामुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. या आक्रमक कार्यकर्त्यांनी बारामती तालुक्यातील सुपे येथे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केली. यानंतर या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात नाराजी

नाशिकमध्ये ध्वजवंदनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणामुळे नवा वाद पेटला आहे. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतला होता. महाजन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला होता. संपूर्ण राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले होते.

महाजन यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेण्याच्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे माझ्याकडून अनावधानाने राहिले असेल. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. तसेच कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.