अंडर 19 टीम इंडियाचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने वर्ल्ड कप स्पर्धेत आपला तडाखा कायम ठेवला आहे. वैभवने सुपर 6 फेरीतील सामन्यात झिंबाब्वे विरुद्ध तडाखेदार खेळी करत अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने नेहमीप्रमाणे मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 24 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने या अर्धशतकी खेळीतील 50 पैकी 40 धावा या अवघ्या 8 चेंडूत केल्या. वैभवने अर्धशतकी खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. वैभवने 208 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ही खेळी केली. वैभवची या स्पर्धेत 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही दुसरी वेळ ठरली. वैभवने त्याआधी बांगलादेश विरुद्ध 72 धावांची खेळी केली होती.
वैभवसोबत पंगा महागातवैभवला या खेळीदरम्यान झिंबाब्वेच्या एका गोलंदाजाने डोखे दाखवले. मात्र वैभवला डोळे दाखवणं झिंबाब्वेच्या गोलंदाजाला चांगलंच महागात पडलं. वैभवने त्याला डोळे दाखवणाऱ्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली आणि धावा मिळवल्या.
नक्की काय झालं?झिंबाब्वेचा गोलंदाज पनाशे मजाई याने पाचव्या ओव्हरदरम्यान वैभवला डोळे दाखवले. वैभवने मजाईच्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर सिक्स लगावला. वैभवने त्याच्या बॉलिंगवर सिक्स मारल्याने मजाई बावचाळला. मजाईने वैभवकडे रागात पाहत डोळे दाखवले. मात्र वैभवने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. मात्र वैभवने झिंबाब्वेच्या या गोलंदाजांचा बॅटिंगने हिशोब केला आणि मस्ती जिरवली.
वैभवने मजाईच्या पुढील षटकात षटकार-चौकार लगावला. वैभवने त्यानंतर नवव्या ओव्हरमध्ये चौकार लगावला. तसेच वैभवने नवव्या ओव्हरमध्ये 1 फोर लगावला. तसेच 1 धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं.
वैभवच्या खेळीचा 52 धावांवर शेवटदरम्यान वैभव वादळी अर्धशतकानंतर काही मिनिटांनी आऊट झाला. वैभवने या सामन्यात मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र वैभव अर्धशतकानंतर 2 धावा जोडून झाल्यानंतर आऊट झाला. वैभवने 30 बॉलमध्ये 52 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
वैभवची या स्पर्धेत 40 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची एकूण आणि सलग तिसरी वेळ ठरली आहे. वैभववर्ल्ड कप मोहिमेतील पहिल्या सामन्यात दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरलेला. वैभवने पहिल्या सामन्यात 2 धावा केल्या. वैभवने त्यानंतर अनुक्रमे 72, 40 आणि आता 52 धावा केल्या आहे. वैभवच्या नावावर अशाप्रकारे या स्पर्धेत एकूण 162 धावा झाल्या आहेत.