मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यासह विमानातील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला. बारामतीमध्ये (Baramati plane crash) लँडींग करताना विमानाने हवेत गिरट्या घेतल्या अन् क्षणार्धात ते खाली कोसळले. येथील एका शेतात कोसळताच विमानाचा मोठा स्फोट झाला अन् उपमुख्यमंत्री अजित पवार, पायलट कॅप्टन सुमित कपूर, शांभवी पाठक यांच्यासह सर्वच 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. विशेष म्हणजे सुमित कपूर यांना विमान प्रवासाचा (Airplane) मोठा अनुभव होता, तर शांभवीलाही 1500 तासांच्या फ्लाईट सेवेचा अनुभव होता. मात्र, दोघांच्याही अनुभवावर काळाने घाला घातला अन् काळा दिवस अवघ्या महाराष्ट्राच्या नशिबी आला.
कॅप्टन सुमित कपूर हे अजित पवारांच्या विमानाचे मुख्य पायलट होते, तर शांभवी पाठक ही सह पायलट होती. शांभवी यांनी 2020 ते 2022 या कालावधीत मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स, एव्हिएशन एयरोस्पेस साइंस आणि टेक्नोलॉजी मध्ये बीएससी पदवी घेतली होती. तत्पूर्वी, 2018-2019 मध्ये न्यूझीलंड इंटरनॅशनल कर्मशिअल पायलट अकॅडमीतून शांभवीने 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स केला होता. तर, 2022 पासून VSR Venture प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फर्स्ट ऑफिसर पदावर त्या कार्यरत होत्या. याच कंपनीच्या माध्यमातून त्या वैमानिक, पायलट म्हणून सेवा देत होत्या.
शांभवी यांना एव्हिएशन सेक्युरिटी स्पाईसजेटकडून परवाना देण्यात आला होता, मार्च 2022 मध्ये हा परवाना इश्यू करण्यात आल्याची माहिती शांभवी यांनी त्यांच्या लिंकड इन प्रोफाईलवरुन दिली आहे. तर, फेब्रुवारी 2022 मध्ये जेट ओरिएंटेशन ट्रेनिंगद्वारे A-320 विमानाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र शांभवीला देण्यात आले होते. दरम्यान, शांभवीची कंपनी असून तिने आपले शिक्षण मुंबईत पूर्ण केले, तिचे वडील सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत होते.
दरम्यान, शांभवी पाठक हिचा 1500 तासांचा अनुभव असून कॅप्टन सुमित कपूर यांचा विमानसेवेतील अनुभव 16000 तासांचा आहे. सुमित यांनी सहारा जे एअरवेज आणि जेट लाईट्स कंपनीसोबत काम केलेलं आहे.
अजित पवार - उपमुख्यमंत्री
विदीप जाधव - अजित पवारांचे सुरक्षा रक्षक
पिंकी माळी - क्रू मेंबर
कॅप्टन सुमित कपूर - पायलट
कॅप्टन शांभवी पाठक - पायलट
अजित पवारांच्या विमानातील क्रू-मेंबर पिंकी; लेकीची शेवटणी आठवण, कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला