राजकारणात दबदबा निर्माण करणारा बापमाणूस गेला, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया, तर अण्णा हजारेंनाही अश्रू दाटून आले
सुनिल भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर January 28, 2026 06:13 PM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू (Ajit Pawar Plane Crash) झाला. त्यानंतर राज्यासह देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकारणासह विविध स्तरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांचे टीकाकार समजले जाणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यावेळी भावुक झाल्याचं दिसून आलं. तर अजित पवारांच्या जाण्यामुळे आपल्याला वेदना झाल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे मुंबईहून बारामतीसाठी निघाले होते. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. विमानाचा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यासाठी देशभरातून बडे नेते उपस्थित राहणार आहेत. 

Anna Hazare On Ajit Pawar : अण्णा हजारे भावुक

अजित पवार यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भावुक झाल्याचं दिसून आलं. त्यावेळी अण्णा हजारे यांच्या डोळ्यात अश्रूही आल्याचं दिसून आलं.  अजित पवारांचे दुर्दैवी निधन झाले हे शब्दांनी सांगता येत नाही असं अण्णा हजारे म्हणाले. समुद्राला आलेल्या भरतीसारखी जनसंख्या वाढत चालली आहे, मात्र त्यातली अजित पवारांसारखी माणसं हरवत चालली आहेत, हे देशाचं आणि समाजाचं मोठं नुकसान असल्याची भावना अण्णा हजारे यांनी व्यक्त केल्या. 

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही अजित पवारांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने दबदबा निर्माण करणारा बापमाणूस गेला, अजितदादा गेल्याच्या बातमीने मनाला खूप वेदना झाल्या. ही बातमी अत्यंत दुःखद असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली. 

Ajit Pawar Plane Crash : विमानात कोण कोण होते?

  • अजित पवार
  • विदीप जाधव
  • पिंकी माळी
  • कॅप्टन सुमित कपूर
  • कॅप्टन शांभवी पाठक

Ajit Pawar Plane Crash Timeline : विमान अपघाताचा घटनाक्रम

  • पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
  • बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाही.
  • त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
  • विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
  • याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
  • धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
  • दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
  • याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला.
  • DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
  • लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
  • सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला.
  • रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.
  • विमान जमीनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
  •  त्यानंतर विमानात भीषण आग लागली.
  • आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.
  • अपघाताचा तपास चालू आहे, DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.