अंबाजोगाई (जि. बीड): अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसरात मराठवाड्यातील पहिला ‘ग्रास लँड सफारी’ प्रकल्प विकसित होत आहे. यानिमित्त वन विभागातर्फे येथील वनपरिक्षेत्रात सोमवारी (ता. २६) ३३ काळवीट सोडण्यात आले. या प्रकल्पामुळे पर्यटन विकासाच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले आहे.
Pune News: ४५ मिनिटांचा प्रवास आता ७ मिनिटांत! खंबाटकीच्या बोगद्याने प्रवासाला गती; जूनपासून वाहतूक सुरू होणार..आमदार नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नगराध्यक्षपद नंदकिशोर मुंदडा, विभागीय वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या उपस्थितीत येथील कुरणवाडी शिवारातील वन विभागाच्या क्षेत्रामध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. येथील वन विभागाच्या परिसरात ‘ग्रास लँड सफारी’ प्रकल्प राबवण्याबाबत आमदार नमिता मुंदडा यांनी वन विभागाला सूचित केले होते. त्यानुसार वन विभागाने प्रस्ताव तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे. पर्यटकांना वन सफारी करता यावी यासाठी सध्या जंगलात एक रस्ताही तयार करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एक पाणवठाही तयार करण्यात आला आहे.
‘सकाळ’कडून पाठपुरावा
बालाघाटच्या रांगेतील या मुकुंदराज परिसरातला पर्यटनाचा दर्जा देण्याबाबत ‘सकाळ’ने अनेकदा प्रकाश टाकला आहे. त्यातून पर्यटनाच्या दृष्टीने या भागातील निसर्गसौंदर्य पुढे आणण्याचा प्रयत्न केला. या भागातील ऐतिहासिक वारसा जतन करण्याबाबतची भूमिका सातत्याने मांडून पुरातन विभाग व राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या नजरेस आणून दिली आहे. परिसरात होत असलेल्या लेण्यांची झिज, दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू, पावसाळ्यात खुलणारे निसर्ग सौंदर्य, विविध धबधबे, वृक्षवल्ली यांचा सारीपाट अनेकवेळा मांडला आहे.
अशी असणार ‘ग्रास लँड सफारी’
अंबाजोगाईच्या वनपरिक्षेत्रात १३ हेक्टर जमीन वन विभागाकडे आहे. डोंगरदऱ्यांचा हा परिसर गवताळ आहे. त्यामुळे या परिसरात ‘ग्रास लँड सफारी’ चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकते. त्यादृष्टीने येथील जंगल विकसित केले जाणार आहे. सफारीसाठी जंगलात विविध रस्ते बनवले जातील. या भागात सध्या दोन बिबट, हरीण, काळवीट, नीलगायींसह इतर प्राणी आहेत. प्राण्यांसाठी पाणवठे व अन्य उपाययोजना या प्रकल्पांतर्गत केल्या जाणार आहेत. याची सुरवात म्हणून ३३ काळवीट जंगलात सोडण्यात आले असल्याचे विभागीय वन अधिकारी अमोल गरकळ यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, सामाजिक वनीकरण विभागीय अधिकारी श्रीनिवास लकमावळ व शंकर वरवडे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड, परिमंडळ अधिकारी विजया शिंगटे यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
पर्यटनाच्या दृष्टीने योग्य ठिकाण
अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसराला निसर्गाची देण आहे. दऱ्या खोऱ्याने नटलेल्या या परिसरात निसर्ग सौंदर्याचे वैभव दाटलेले आहे. त्यात वनराई फुलवण्याची गरज आहे. या परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यात प्रामुख्याने, एका दरीत मराठीचे आद्यकवी स्वामी मुकुंदराज यांची समाधी आहे. हा मंदिर परिसरही आता विकसित होत आहे. पहाडीच्या कपारीमध्ये असलेले बुट्टेनाथ, नागनाथ मंदिर, जैन व वैष्णव लेणीचा ऐतिहासिक वारसा असलेले भूचरनाथ (हत्तीखाना), हेमाडपंती सकलेश्वर (बाराखांबी) मंदिर, तीर्थक्षेत्र योगेश्वरी मंदिर, खोलेश्वर व अमृतेश्वर मंदिर हा ऐतिहासिक वारसा पर्यटकांना खुणावत असतो. मुकुंदराज व पठाण मांडवा परिसर जंगल सफारीच्या दृष्टीने आता विकसित होणार आहे.
Solapur Tirupati flight: सोलापूर-तिरुपती विमानसेवेस पुण्याचा अडथळा; पुणे विमानतळावर स्लॉट मिळेना, स्टार कंपनीकडून सोलापुरात चाचपणी! संवर्धनाचा प्रयत्नअंबाजोगाई परिसरात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठा वाव आहे. मराठवाड्यात असा प्रकल्प सध्यातरी कुठे नाही. अंबाजोगाई परिसरात त्याची सुरवात झाली आहे. हा परिसर खूप सुंदर आहे. या ‘ग्रास लँड प्रकल्पा’मुळे परिसरात रोजगार उपलब्ध होईल. लोकांचे पर्यटनही होईल. हा प्रकल्प विकसित झाल्यास जंगलातील प्राणी जंगलातच राहतील. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानही होणार नाही, अशी प्रतिक्रीया जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली