पायलटचा निरोप आला की जावं लागतं; अजितदादांचा जुना व्हिडीओ व्हायरल
esakal January 29, 2026 07:45 AM

Ajit Pawar Passed Away: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघतात दुर्दैवी निधन झाल्यानं राज्यासह देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी अजित पवार यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याच्या भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. अजित पवार हे त्यांच्या वक्तशीरपणा, परखड आणि बेधडक बोलण्यामुळे ओळखले जात होते. आता त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अजित पवार यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ९ जानेवारी २०२६ रोजीचा आहे. महानगरपालिकेचा प्रचार आटोपून निघण्याच्या घाईत अजित पवार होते. त्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांकडून गराडा घालण्यात आला होता. दरम्यान, पायलटचा निरोप आला की जावं लागतं असं अजित पवार म्हणाले होते. आता त्यांच्या विमान दुर्घटनेत निधनानंतर हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Ajit Pawar Death : शरद पवार बारामतीत दाखल, हेलिकॉप्टरमधून उतरताच दुर्घटनेची माहिती घेतली

बारामती, पुणे किंवा राज्यात कुठेही दौरा असेल तर अजित पवार पहाटेपासूनच कामाला लागायचे. वेळ पाळण्याबाबत ते काटेकोर होते. कार्यक्रमांना वेळेच्या आधीच पोहोचत असतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीोमध्ये अजित पवार यांना कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली जात असल्याचं दिसतं. तेव्हा अजित पवार म्हणतात की, पायलटचा निरोप आला किंवा उशीर झाला की मला निघून जावं लागतं.

मुंबईहून बारामतीत एका सभेसाठी अजित पवार विमानाने येत होते. बारामतीत विमानाच्या लँडिंगवेळी कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टी पायलटला दिसली नाही. तेव्हा पायलटने दुसऱ्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र लँडिंगवेळी विमान कोसळल्यानंतर मोठे स्फोट झाले आणि आगीचा भडका उडाला. विमानातून प्रवास करणाऱ्यांपैकी कुणीच वाचलं नाही. सकाळी ८ वाजून ४५ ते ५० मिनिटांच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.